Nitin Gadkari | 1 लाख गुंतवा आणि मिळवा 8 % परतावा; मंत्री नितिन गडकरींची जबरदस्त संकल्पना

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – Nitin Gadkari | केंद्रातील मोदी सरकारकडून (Modi Government) रस्त्यांसारख्या पायाभूत सुविधांच्या प्रकल्पांसाठी (Infrastructure Projects) परदेशी गुंतवणूकदारांकडून निधी घेतला जाणार नाही. त्याचबरोबर लहान गुंतवणूकदारांकडूनच निधी उभारण्यात येणार आहे. पायाभूत सुविधा प्रकल्पांसाठी एक लाख रुपये गुंतवण्यास इच्छुक असलेल्या लहान गुंतवणूकदारांना प्रतिवर्षी 8 टक्के निश्चित परतावा सरकारकडून देण्यात येईल, याबाबत माहिती केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी (Nitin Gadkari) यांनी दिली.

 

”शहरे आणि शहरांमधील रेल्वे क्रॉसिंगवर रोड ओव्हरब्रिज बांधण्यासाठी 8 हजार कोटी रुपयांच्या प्रकल्पावर काम सुरुय. त्यांचं मंत्रालय वार्षिक 5 लाख कोटी रुपयांपेक्षा जास्त काम करतो. हे पाहून परदेशी गुंतवणूकदार भारतीय रस्ते प्रकल्पात गुंतवणूक करू इच्छितात पण सरकारला यात रस नाही.” महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्स, इंडस्ट्री ॲण्ड ॲग्रिकल्चरतर्फे (Maharashtra Chamber Of Commerce, Industry And Agriculture) आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते. तसेच ”मला श्रीमंतांना अधिक श्रीमंत करायचे नाही. त्यांच्याऐवजी मी शेतकरी, शेतमजूर, हवालदार, कारकून आणि सरकारी कर्मचारी यांच्याकडून पैसे गोळा करीन,” असं नितिन गडकरी (Nitin Gadkari) यांनी सांगितलं आहे.

नितिन गडकरी पुढे म्हणाले की, ”पुढील काळात सोलापूर, सांगली, नाशिक येथे ड्रायपोर्ट सुरु करण्यात येतील.
या प्रकल्पांमध्ये साठा, प्रीकूलिंग प्लान्ट, उत्पादन प्रक्रिया सुविधा उपलब्ध असेल.
त्यामुळे नागपूरातील संत्री, सूत आणि कापड थेट हल्दियाला पाठवलं जाईल.
तिथून बांग्लादेशमध्ये पुरवठा केला जाईल. सध्या वर्धा जिल्ह्यातील सिंधी आणि जालना येथे ड्रायपोर्ट सुरु करण्यात आले असल्याचं ते म्हणाले.”

 

दरम्यान, ”लॉजिस्टिक खर्च (Logistic Costs) ही उद्योगांपुढे सर्वात मोठी समस्या आहे.
हा खर्च कमी करण्याची आवश्यकता आहे.
आपल्या देशात लॉजिस्टीक खर्च १४ ते १६ टक्के इतका आहे.
हा खर्च कमी करण्यासाठी पायाभूत सुविधा निर्माण कराव्या लागणार आहेत.
केंद्रीय रस्ते वाहतूक व महामार्ग मंत्रालय (Union Ministry Of Road Transport And Highways) पुढील काळामध्ये दोन लाख कोटींचे लॉजिस्टिक पार्क बांधत आहे.
तसेच देशात 20 महामार्गावर विमान उतरवण्याची सुविधा आहे.” अशी माहिती गडकरी यांनी दिली आहे.

 

Web Title :- Nitin Gadkari | for india road projects will rise money from small investors not interested in foreign investment union minister nitin gadkari

 

Join our WhatsApp Group, Telegram, facebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा