Nitin Gadkari | वाढत्या अपघातांबाबत नितीन गडकरींचे धक्कादायक विधान; म्हणाले – ‘देशातील पुलांची एक्स्पायरी डेट नसल्याने अपघात आणि मृत्यू’

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – Nitin Gadkari | केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी (Nitin Gadkari) यांनी मंगळवारी एका पुस्तक प्रकाशन कार्यक्रमात देशातील वाढत्या अपघातांच्या घटनांबाबत धक्कादायक विधान केलं आहे. ‘देशातील पुलांची कोणतीही एक्स्पायरी डेट (Expiry Date) नसल्याने अपघात होतात आणि मृत्यू होतो. त्यामुळे आता पुलांची एक्स्पायरी डेट निश्चित करण्याची वेळ आली असल्याचे त्यांनी म्हंटले आहे.

 

नितीन गडकरी (Nitin Gadkari) म्हणाले, ‘फायनान्शियल ऑडिट आवश्यक आहे, पण क्वालिटी ऑडिट आणि कन्स्ट्रक्शन क्वालिटी ऑडिट हे तितकेच महत्त्वाचे आहे.
रस्ते बांधणीत नवीन सामग्रीचा वापर करणे आवश्यक आहे.
कार्बन स्टील आणि स्टील फायबर यांसारखी सामग्री वापरायला प्रोत्साहन मिळाले पाहिजे.
रस्ते बांधणीत स्टील आणि सिमेंटचा वापर कमी करणे, हे माझे एक ध्येय असून स्टील फायबर वापरणे हा अभिनव निर्णय आहे.

दरवर्षी जवळपास साडे चार लाख रस्ते अपघात –

रस्ते अपघातांच्या घटनांमध्ये दिवसेंदिवस वाढ होत आहे. संसदेच्या गेल्या पावसाळी अधिवेशनात रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्रालयाने (Ministry of Road Transport and Highways) रस्ते अपघातांची आकडेवारी जाहीर केली होती.
त्यामध्ये 2019 ला रस्ते अपघातांची संख्या 4 लाख 40 हजार 2 होती.
तत्पूर्वी 2018 मध्ये हा आकडा 4,67,044 आणि 2017 मध्ये 4,64,910 होता.
ही आकडेवारी राज्यांनी दिलेल्या माहितीच्या आधारे तयार करण्यात आल्याचे मंत्रालयाने म्हटले होते.

 

Web Title :-  Nitin Gadkari | india there are no expiry dates bridges and result we have faced many accidents and deaths nitin gadkari

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा