नितिन गडकरी यांनी ‘पीएम नरेंद्र मोदी’ चित्रपटाचे पोस्टर केले लॉन्च, २४ मेला प्रदर्शित होणार चित्रपट

नागपुर : पोलिसनामा ऑनलाईन – लोकसभा निवडणुकीचे मतदान संपल्यानंतर विविध वाहिन्यांनी केलेल्या एक्सिट पोलमध्ये राष्ट्रीय लोकशाही आघाडी अर्थात एनडीएला स्पष्ट बहुमत मिळत आहे. एनडीएच्या या विजयी अंदाजानंतर केंद्रीय मंत्री व भाजपचे नेते नितीन गडकरी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर येत असलेल्या आगामी ‘ पीएम नरेंद्र मोदी’ चित्रपटाच्या पोस्टरचे अनावरण केले. ‘आ रहे हैं दोबारा प्रधानमंत्री नरेंद्र मोदी..अब कोई नहीं रोक सकता’ अशी दमदार ओळ त्या पोस्टरवर लिहिण्यात आली आहे.

नव्या पोस्टरमध्ये अभिनेता विवेक ओबेरॉय शंख वाजवताना दिसत आहे. विवेक ओबेरॉयने या चित्रपटात नरेंद्र मोदी यांची प्रमुख भूमिका साकारली आहे. पोस्टर लाँच करण्याच्या प्रसंगी अभिनेता विवेक ओबेरॉय म्हणाला कि, माझी इच्छा आहे, देशाच्या फायद्यसासाठी नरेंद्र मोदी पुन्हा पंतप्रधान व्हावेत. लहान मुलांनी हा चित्रपट पाहावा आणि त्यातून काहीतरी शिकावे. ज्या लोकांना राजकारणामध्ये करिअर करायचे आहे त्यांच्यासाठी हा चित्रपट आदर्श असा चित्रपट आहे.

गडकरी म्हणाले कि, उमंग कुमारने दिग्दर्शित केलेल्या या चित्रपटात विवेकने चांगले काम केले आहे. ते म्हणाले कि मी चित्रपट पाहिला आहे. नवी पिढीला हा चित्रपट पाहून प्रेरणा मिळेल आणि चांगली दिशा मिळेल चित्रपटाचे निर्माते संदीप सिंह यांनी चांगले प्रयत्न केले आहेत. या चित्रपटातून देशातील तरुणाईला चांगला संदेश मिळेल. सखोल संशोधन करून हा चित्रपट तयार करण्यात आला आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या जीवनावर आधारित असलेल्या या चित्रपटाला निवडणूक आयोगाने ११ एप्रिलला प्रदर्शित होण्यापासून रोखण्यात आले होते. हा चित्रपट आता २४ मेला प्रदर्शित होणार आहे.

पोलीसनामा न्युज आता टेलीग्रामवर... आमचं चॅनेल (@policenamanews) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
WhatsAPP
You might also like