खराब रस्ते बनवणाऱ्या कंत्राटदारांवरसुद्धा होणार ‘दंडात्मक’ कारवाई ! नितीन गडकरींनी ट्विटद्वारे सांगितलं

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – खराब रस्ते बनवणाऱ्या कंत्राटदारांना दंड आकारला जाणार आहे. केंदीय परिवाहमंत्री नितीन गडकरी याबाबतचे ट्विट करत महिती दिली आहे. ट्विटमध्ये स्पष्ट सांगण्यात आले आहे की, नवीन मोटार वाहन कायद्याअंतर्गत फक्त वाहनचालकांनाच नाही तर खराब रस्त्यांची निर्मिती करणाऱ्या कंत्राटदारांनवर सुद्धा दंडात्मक कारवाई करण्यात येणार आहे.

आतापासून जर रास्ता बनवणाऱ्या कंत्राटदाराने रस्ता खराब बनवला किंवा निर्मितीच्या प्रक्रियेमध्ये खराब सामग्रीचा वापर केला तर अशा ठेकेदारावर आता कारवाई केली जाणार आहे. त्याअंतर्गत आता ठेकेदाराने एक लाखांपर्यंत दंड होऊ शकतो.

रस्त्यांच्या नियमांबाबत गडकरी हे खूप चिंता व्यक्त करत होते याबाबतचे अनेक ट्विट त्यांनी या आधी देखील केले आहे. या आधी त्यांनी फॉल्टी वाहन निर्मिती करणाऱ्यांबाबत सुद्धा ट्विट केले होते आणि वाहन निर्मात्यांवर सुद्धा दंडात्मक कारवाई होणार असल्याचे त्यांनी सांगितले होते.

याआधीही नितीन गडकरी यांनी ट्विटरद्वारे एका मीडिया चॅनलवर ताशेरे ओढले होते. एका वृत्तवाहिनीचा व्हिडीओ शेअर करत गडकरी यांनी मला माफ करा कारण आज पुन्हा आमच्या एका मीडिया मित्राने रस्ता सुरक्षेच्या बाबतीतील गोष्टींची थट्टा केली असल्याचे म्हंटले होते. या आधीही नितीन गडकरी यांनी नव्या मोटार वाहन कायद्यबाबत अफवा पसरावणाऱ्यांना फटकारले होते.

त्यांनी म्हंटले होते की, लोकांशी निगडित असलेल्या अशा गंभीर गोष्टींबाबत लोकांमध्ये खोट्या गोष्टी पसरवू नका. एका प्रतिष्ठती चॅनल ने आपल्या कार्यक्रमातून एक स्टोरी प्रकाशित केली होती ज्याचे शीर्षक होते, नवीन मोटार वाहन कायदा, आपल्याला अर्ध्या बाह्यांचे कपडे घातल्याबद्दल दंड आकारला जाऊ शकतो.