Nitin Gadkari On Fuel Price Hike | इंधन दरवाढीमागील नितीन गडकरी यांनी सांगितले खरे कारण; जाणून घ्या…

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – Nitin Gadkari On Fuel Price Hike | गेल्या पाच दिवसापासून इंधन दरवाढीचा पुन्हा भडका उडाला आहे. पेट्रोल आणि डिझेलच्या किमतीत (Petrol And Diesel Prices) सातत्याने वाढ होत असून आजही दरवाढ झाली आहे. आजच्या नव्या दरानुसार पेट्रोल आणि डिझेलच्या दरात प्रतिलिटर 80 पैशांची वाढ झाली आहे (Nitin Gadkari On Fuel Price Hike). या वाढत्या दरवाढीचा फटका सर्वसामान्यांना बसत आहेत. दरम्यान, शनिवारी झालेल्या दरवाढीनुसार राजधानीत एक लिटर पेट्रोलची किंमत 98 रुपये 61 पैसे आणि एक लिटर डिझेलची किंमत 89 रुपये 87 पैशांवर पोहोचली आहे. (Nitin Gadkari said the real reason behind the fuel price hike)

 

वाढत्या इंधन दरवाढीसंदर्भात केंद्रीय मंत्री नितीन गडकरी (Nitin Gadkari) यांना प्रश्न विचारण्यात आला त्यावर त्यांनी या दरवाढीमागील कारण सांगितले आहे.
गडकरी म्हणाले की, ”80 टक्के तेल भारत आयात करत आहे.
त्यातच सध्या रशिया (Russia) आणि युक्रेन (Ukraine) यांच्यात युद्ध सुरू असल्याने, त्याचा परिणाम अनेक देशांवर होत आहे.
युद्ध परिस्थितीमुळे आंतरराष्ट्रीय बाजारात तेलाच्या किमती वाढल्या आहेत. त्यावर आपण काहीही करू शकत नाही.”

रस्त्यावर 10.60 लाख इलेक्ट्रिक वाहने –
राज्यसभेतील एका प्रश्नाला उत्तर देताना गडकरी म्हणाले की, ”देशात 19 मार्च 2022 पर्यंत 10 लाख 60 हजार इलेक्ट्रिक वाहनांची नोंद झाली आहे. ‘ब्युरो ऑफ एनर्जी एफिशिअन्सी’नुसार (Bureau Of Energy Efficiency) 21 मार्च 2022 पर्यंत देशात 1,742 सार्वजनिक इलेक्ट्रिक वाहन चार्जिंग स्टेशन कार्यरत झाले आहेत. महामार्गाच्या निर्मितीवेळीच इलेक्ट्रिक वाहन चार्जिंग स्टेशन (Electric vehicle charging station) उभारले जात आहे. हे स्टेशन उभारण्याची जबाबदारी महामार्ग बनवणाऱ्या कंपन्यांची आहे. अशा प्रकारची 39 कंत्राटे राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाने National Highways Authority Of India (NHAI) दिली आहेत. प्रमुख महामार्गांवर 5 किमीच्या अंतराने हे चार्जिंग स्टेशन उभारली जाणार आहेत. (Nitin Gadkari On Fuel Price Hike)

 

लोकांमध्ये उत्सुकता –
अलीकडच्या काही दिवसांमध्ये लोकांमध्ये इलेक्ट्रिक वाहनांबाबत कमालीची उत्सुकता आहे.
शिवाय सरकारनेही इलेक्ट्रिक वाहनांना प्रोत्साहन देण्याचे धोरण अवलंबले आहे.
एकूणच इलेक्ट्रिक वाहनांना चालना द्यायची असेल, तर सार्वजनिक चार्जिंग स्टेशन्सची संख्या झपाट्याने वाढणे आवश्यक आहे.
त्यामुळे याकडे सरकारचे विशेष लक्ष असल्याचे सूत्रांनी सांगितले.

 

Web Title :- Nitin Gadkari On Fuel Price Hike | petrol and diesel prices are rising in india due to russia ukraine war says union minister nitin gadkari

 

Join our WhatsApp Group, Telegram, facebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा