Nitin Gadkari | नितीन गडकरींची मोठी घोषणा; म्हणाले – ‘पुणे-सातारा महामार्गावरील टोल रद्द करणार’ (व्हिडीओ)

पुणे : पोलीसानामा ऑनलाइन – केंद्रीय रस्ते आणि वाहतूक मंत्री नितीन गडकरी (Nitin Gadkari) हे आज (शुक्रवार) पुणे दौऱ्यावर आहेत. पुण्यातील सिंहगड रस्ता उड्डाणपुलाच्या भूमिपूजनाच्या कार्यक्रमात बोलताना नितीन गडकरी (Nitin Gadkari) यांनी मोठी घोषणा केली आहे. पुणे सातारा राष्ट्रीय महामार्गावरील (Pune Satara National Highway) टोल रद्द (toll cancel) करुन रस्त्याच्या कामासाठी राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाकडून (National Highways Authority) 50 कोटींचा निधी देण्यात येईल. तसेच रस्त्यावर होणारे अपघात व आवश्यक उपाययोजनांचा एक खाजगी संस्था अभ्यास करत असून, याचा लवकरच अहवाल सादर करण्यात येणार असल्याची माहिती नितीन गडकीर यांनी दिली.

 

पुणे जिल्ह्यात 221 किमी लांबीच्या 22 महामार्ग प्रकल्पांचा नारळ गडकरींच्या हस्ते आज फोडण्यात आला. राष्ट्रीय महामार्गाच्या माध्यमातून जिल्ह्यात तब्बल 134 कोटी रुपयांचे रस्ते, पुलांची कामे केली जणार आहेत. यावेळी नितीन गडकरी आणि पुण्याचे पालकमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांच्या उपस्थितीत प्रकल्पांचे भूमिपूजन आणि लोकार्पण करण्यात आले. यावेळी विधान परिषदेच्या उपाध्यक्षा डॉ. निलम गोऱ्हे (Dr. Nilam Gorhe), महापौर मुरलीधर मोहोळ (Mayor Murlidhar Mohol), खासदार गिरीश बापट (MP Girish Bapat), सुप्रिया सुळे (Supriya Sule) यांच्यासह आमदार व अधिकारी उपस्थित होते.

नितीन गडकरींचा अजित पवारांना सल्ला
पुण्यासाठी अत्यंत महत्त्वाच्या ठरणाऱ्या दोन रस्त्यांची कामे हाती घेण्यात आली आहेत. त्यापैकी एक म्हणजे पुणे-बंगळुरू महामार्ग (Pune-Bangalore Highway). पुणे बंगळुरू हा नवीन ग्रीन हाय-व्हे एक्सीस कंट्रोल (Green highway access control) आम्ही बांधत आहोत. या रस्त्यावर नवीन पुणे विकसित करण्याचा विचार करा. यामुळे भविष्यात पुण्याचे कंजेशन कमी होईल, असा सल्ला गडकरी यांनी अजित पवार यांना दिला.

 

दिल्लीला थेट नरीमन पॉइंटशी जोडून देतो

नितीन गडकरी म्हणाले, माझं वरळी-वांद्र्याशी भावनीक नातं आहे. या कामासाठी 60 ते 70 हजार कोटी लागले, तरी मी एक असा मंत्री आहे की ज्याच्याकडे पैशांची काही कमी नाही. आणि मी कोणत्या अर्थमंत्र्यांकडे पैसे मागालयालही जात नाही. त्यामुळे पैसा कसा उभा करायचा ही समस्या नाही. हाही बांधायला मी तयार आहे. फक्त याबाबत तुम्ही मुख्यमंत्र्यांसोबत (CM) चर्चा करुन धोरणात्मक काही निर्णय झाला, तर दिल्लीला नरीमन पॉईंटशी (Nariman Point) थेट थोडून देण्याचं काम मी करुन देतो, असे गडकरी म्हणाले.

… तर दिल्ली 12 तासांत
नितीन गडकरी (Nitin Gadkari) पुढे म्हणाले, अजित दादा, मी आता दिल्ली-मुंबई एक्सप्रेस वे बांधतोय. परवा मी त्याचं काम पाहिलं.
एका ठिकाणी तो 12 लेन आहे. त्यावर 170 किमी स्पीडच्या गाडीत बसलो होतो. पण पोटातलं पाणी हललं नाही.
त्याचं 70 टक्के काम झालं आहे. फक्त महाराष्ट्रातलं (Maharashtra) काम राहिलं आहे. या हायवेला मी जेएनपीटी (JNPT) पर्यंत नेणार आहे.
माझी इच्छा होती की वसई-विरारपासून वरळी बांद्र्यापर्यंत हा मार्ग जोडला तर नरीमन पॉईंटवरुन थेट दिल्लीला 12 तासात पोहोचता येईल,
असेही गडकरी यांनी यावेळी सांगितलं.

पुण्यात रिंग रोड बांधून देतो
भुसंपादन करुन दिलं तर पुण्यात रिंग रोड (Ring Road in Pune) बांधून देईन, अशी मोठी घोषणा नितीन गडकरी यांनी यावेळी केली.
पुणे-बंगळुरू (Pune-Bangalore Highway) 40 हजार कोटी रुपयांचा नवा महामार्ग बांधण्याची योजना आहे.
याशिवाय नव्या महामार्गाच्या शेजारी नवं शहर वसवायचं आहे, असेही ते म्हणाले.

Web Titel :-  Nitin Gadkari | toll pune satara road finally canceled nitin gadkaris big announcement

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Loan Management TIPS | कर्जाच्या ओझ्यापासून दूर राहण्यासाठी ‘या’ पध्दतीनं करा मॅनेजमेंट; कर्ज फेडताना होणार नाही त्रास

Ajit Pawar and Nitin Gadkari | अजित पवारांना सकाळी-सकाळी नितीन गडकरींचा काॅल अन्….

Delhi Shootout | दिल्लीच्या रोहिणी कोर्टातील शूटआऊटचा थरारक व्हिडिओ, फायरिंग फायरिंग ओरडत पळत होते लोक (Video)