Nitin Landge Bribe case | पिंपरी-मनपाचे स्थायी समिती अध्यक्ष अ‍ॅड. नितीन लांडगे यांच्यासह 5 जणांना पोलीस कोठडी

पुणे / पिंपरी : पोलीसनामा ऑनलाइन – पिंपरी चिंचवड महापालिकेच्या (Pimpri Chinchwad Municipal Corporation) स्थायी समितीच्या (Standing Committee) अध्यक्षा अ‍ॅड नितीन लांडगेसह पाच जणांना लाच लुचपत प्रतिबंधक विभागाने अटक (Nitin Landge Bribe case) केली आहे. लाच लुचपत प्रतिबंधक विभागाने बुधवारी (दि.18) पिंपरी चिंचवड महापालिकेतील स्थायी समिती अध्यक्षांचा स्वीय सहाय्यकाच्या केबिनमध्ये अचानक छापा (Nitin Landge Bribe case) टाकला. त्यावेळी 8 लाखाहून अधिक बेकायदा रक्कम आढळून आली. या कारवाईनंतर लाच लुचपत प्रतिबंधक विभागाने (anti corruption bureau) तातडीने अध्यक्ष व स्वीय सहाय्यकाच्या घरावर छापे टाकले. आज स्थायी समितीचे अध्यक्षासह पाच जणांना न्यायालयात हजर करण्यात आले. त्यावेळी सरकारी वकिलांनी 4 दिवसांची पोलीस कोठडीची (police custody) मागणी केली. न्यायालयाने युक्तीवाद ऐकून पाच जणांना एक दिवसाची पोलीस कोठडी सुनावली आहे. आरोपींना शनिवारी (दि.21) पुन्हा न्यायालयात हजर करण्यात येणार आहे.

स्थायी समितीचे अध्यक्ष अ‍ॅड. नितीन ज्ञानेश्वर लांडगे (Adv. Nitin Dnyaneshwar Landge), मुख्य लिपीक व स्थायी समिती अध्यक्षांचे स्वीय सहायक ज्ञानेश्वर किसनराव पिंगळे (Dnyaneshwar Kisanrao Pingale), लिपिक विजय शंभुलाल चावरिया (Vijay Shambhulal Chawria), संगणक चालक राजेंद्र जयवंतराव शिंदे, शिपाई अरविंद भिमराव कांबळे असे पाच जणांना लाच लुचपत प्रतिबंधक विभागाने लाच स्विकारल्याप्रकरणी अटक केली आहे.

सरकारी वकिलांचा युक्तिवाद
सरकारी वकिलांनी न्यायालयात सांगितले, आरोपींच्या आवाजाचे नमुने घेयचे आहेत. तसेच या गुन्ह्यातील आरोपी हे स्थायी समिती अध्यक्ष असून त्यांचे इतर कोणी साथीदार आहेत का ? किंवा त्यांनी इतरांना अशा प्रकारे लाच मागितली आहे का याबाबत तपास करायचा आहे.

या गुन्ह्यामध्ये 13 ऑगस्ट रोजी पडताळणी दरम्यान ज्ञानेश्वर पिंगळे यांना तक्रारदार यांनी 3 टक्क्यामध्ये कमी करुन दोन टक्के करण्याची विनंती केली होती. त्यावेळी पिंगळे यांनी पैसे वर 16 जणांना द्यावे लागतात असे सागितल्याचे रेकॉर्ड आहे. त्यामुळे ते 16 लोक कोण आहेत याचा सखोल तपास करणे बाकी आहे. पडताळणीमध्ये स्वत: नितीन लांडगे यांनी 3 टक्के ऐवजी 2 टक्के करा असा आदेश पिंगळे यांना दिला. या दोघांमधील व्हाईल रेकॉर्ड आहे.

स्थायी समती अध्यक्ष नितीन लांडगे यांच्या मालमत्तेचा शोध सुरु आहे. त्यांच्या राहत्या घराची झडती घेण्यात आली आहे. याशिवाय त्यांची इतर मालमत्ता असल्याची माहिती असून ती शोधायची आहे. हे एक मोठे रॅकेट असून त्यामध्ये कोण कोण सहभागी आहे याचा तपास करायचा आहे.

सापळा कारवाईमध्ये ज्ञानेश्वर पिंगळे यांची अंगझडती व कार्यालयाची झडती घेतली असता 5 लाख 68 हजार 560 रुपये रोख मिळाले आहेत.
या रकमेपैकी 5 लाख 20 हजार स्थायी समीती अध्यक्ष यांनी नुकतेच दिल्याचे पिंगळे यांनी सांगितले.
परंतु त्याबद्दल समधानकारक खुलसा पिंगळे यांनी केलेला नाही. या रक्कमेचा तपास करायचा आहे.
सापळा कारवाई दरम्यान राजेंद्र शिंदे यांच्याकडे 24 हजार 480 रुपये रोख रक्कम सापडली असून याही रक्कमेचा तपास करायचा आहे.
याशिवाय टेंडर प्रक्रिये संदर्भातील कागदपत्रे हस्तगत करायची आहेत.
अटक करण्यात आलेल्यांच्या वतीनं अ‍ॅड. प्रताप परदेशी यांनी पोलिस कोठडी देण्यास विरोध केला.

Web Title :- Nitin Landge Bribe case | Pimpri-Municipal Corporation Standing Committee Chairman Adv. Five persons, including Nitin Landage, have been remanded in police custody

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Pune Crime | पुण्यातील उद्योजक गायकवाड बाप-लेकास तब्बल ‘एवढया’ दिवसांची पोलिस कोठडी

Parambir Singh | मुंबईचे माजी पोलीस कमिश्नर परमबीर सिंह यांना 25 हजार रुपयांचा दंड, चांदीवाल कमिटी समोर गैरहजर

Korean Glass Skin | कोरियन मुलींप्रमाणे त्वचा मिळवायची आहे का? तर ‘हे’ नक्की करा !