Coronavirus in Maharashtra | चिंताजनक ! राज्यात सलग दुसर्‍या दिवशी कोरोनाच्या रूग्णांमध्ये वाढ, जाणून घ्या आकडेवारी

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – राज्यात कोरोना बाधित (Coronavirus in Maharashtra) रुग्णांची संख्या हजाराच्या आत आल्याने दिलासा मिळाला होता. मात्र, आता कोरोना बाधित रुग्णांची संख्या दीड हजाराच्या आसपास पोहोचल्याने चिंता व्यक्त केली जात आहे. त्यातच दररोज कोरोनाचा नवा व्हेरियंट ओमिक्रॉनचे (Omicron Covid Variant) रुग्ण आढळून येत असल्याने चिंता अधिक वाढली आहे. आज दिवसभरात राज्यात 1485 नवीन कोरोना बाधित (Coronavirus in Maharashtra) रुग्णांची नोंद झाली आहे. तर 796 रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत.

 

मागील दोन ते तीन दिवसांपासून कोरोनाची संख्या ही हजारांच्या पुढेच येत आहे. यातच नाताळ (Christmas) आणि वर्षाअखेर यामुळे होणाऱ्या गर्दीमुळे कोरोना रुग्णांची संख्या वाढण्याची शक्यता आहे. तसेच ओमिक्रॉन व्हेरियंटने देखील चिंता वाढवली आहे. राज्यात आज औरंगाबादमध्ये (Aurangabad) दोन ओमिक्रॉन व्हेरियंटचे रुग्ण आढळून आले आहेत. त्यामुळे राज्यात ओमिक्रॉन बाधित रुग्णांची संख्या 110 इतकी झाली आहे. त्यापैकी 57 रुग्ण ओमिक्रॉनमुक्त झाले आहेत.

 

राज्यात आजपर्यंत 65 लाख 02 हजार 039 रुग्णांनी कोरोनावर (Coronavirus in Maharashtra) मात केली आहे. त्यामुळे राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण (Recovery Rate) 97.98 टक्के झाले आहे. राज्यात आज 12 रुग्णांच्या मृत्यूची नोंद झाली आहे. राज्याचा मृत्यू दर (Fatality Rate) 2.12 टक्के झाला आहे.

 

राज्यात आजपर्यंत 6 कोटी 83 लाख 53 हजार 269 प्रयोगशाळा तपसण्या करण्यात आल्या आहेत. यामध्ये 66 लाख 56 हजार 240 जणांना कोरोनाची बाधा झाली आहे. राज्यात रुग्ण आढळून येण्याचे प्रमाण 9.74 टक्के आहे. सध्या 9 हजार 102 रुग्णांवर उपचार सुरु आहेत. राज्यात 92 हजार 048 व्यक्ती होम क्वारंटाईनमध्ये (Home Quarantine) आहेत. तर 887 व्यक्ती संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये (Institutional Quarantine) आहेत.

 

Web Title :- Coronavirus in Maharashtra | Worrying! Increase in corona patients for second day in a row in maharashtra, know statistics

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

PM Kisan Scheme | खुशखबर ! नवीन वर्षात ‘या’ शेतकर्‍यांच्या अकाऊंटमध्ये येऊ शकतात 4000 रुपये, जाणून घ्या तुम्हाला मिळणार का?

MahaTET Exam Scam | TET घोटाळा प्रकरणात तुकाराम सुपेनंतर ‘या’ आरोपीकडून 24 किलो चांदी 2 किलो सोनं, हिरे जप्त

Omicron Restrictions Pune | पुणे जिल्ह्यात कडक निर्बंध लागू ! ख्रिसमस, थर्टी फर्स्टच्या हंगामात हाॅटेल्स, रेस्टॉरंटवर निर्बंध; जाणून घ्या सविस्तर

Kirit Somaiya | ‘अनिल परब यांची आमदारकी आणि मंत्रीपद रद्द करण्यासाठी राज्यपाल आणि निवडणूक आयोगाकडे जाणार’