‘या’ कारणामुळं बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमारांचा महाराष्ट्रातील निवडणुकांवर ‘वॉच’, जाणून घ्या

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – भारतीय जनता पार्टी ज्या प्रकारे आपली सीमा विस्तारत आहे, त्यामुळे विरोधकांबरोबरच मित्रपक्षांना देखील त्यांची रणनीती बदलण्यास भाग पाडले आहे. महाराष्ट्रात भाजपशी संबंध नेमके असे असावेत आणि ते कसे टिकवायचे हे ठरविण्यास शिवसेनेला अजूनही ठरवता आले नाही. अनेक दशकांपासून भाजपाच्या मोठ्या भावाची भूमिका निभावणारी शिवसेना आता कमी जागांवर समाधान मानण्यासही तयार आहे. सूत्रांच्या माहितीनुसार भाजप त्यांना समान दर्जा देण्यास तयार नाही. अशा परिस्थितीत आदित्य ठाकरे यांना मुख्यमंत्रिपदाचे उमेदवार घोषित करणार असल्याच्या बहाण्यावरून शिवसेना भाजपवर दबाव आणत आहे. परंतु सध्यातरी त्याचा काहीच प्रभाव भाजपाच्या नेतृत्त्वावर दिसत नाही. या सर्वांच्या दरम्यान नितीशकुमार मात्र महाराष्ट्राच्या राजकारणावर लक्ष ठेवून आहेत. जाणून घेऊयात यामागील कारण –

जेडीयू आणि शिवसेनेच्या अवस्थेमधील साम्य :
मित्रपक्षांबद्दलचे हे राजकारण फक्त महाराष्ट्राबद्दलच नाही तर बिहारमध्ये देखील तशीच परिस्थिती आहे. परंतु या विषयावर कोणी बोलायला तयार नाही. नितीशकुमार यांचा निकटवर्ती मानला जाणारा नेता असा दावा करतो की नितीशकुमार हे महाराष्ट्राच्या राजकारणावर बारीक नजर ठेवून आहेत. भाजप-शिवसेनेच्या संबंधांचा बिहारच्या राजकारणावरही परिणाम होईल, कारण बिहारच्या राजकारणामध्ये जेडीयूची अवस्था तशीच आहे जशी जवळपास एक दशकापूर्वी महाराष्ट्रातील राजकारणात शिवसेनेची होती. अशा परिस्थितीत बिहारचे मुख्यमंत्री आणि जेडीयू अध्यक्ष नितीशकुमार यांची चिंता करणे साहजिकच आहे.

नितीशकुमार यांच्यासमोरचे कठीण आव्हान :
तज्ज्ञांच्या मते नितीशकुमारांसमोरचे संकट हे शिवसेनेपेक्षा गंभीर आहे. भाजप आणि शिवसेनेची कोर व्होट बँक एक आहे, त्यामुळे दोन्ही पक्षांनी समवेत जाणे व वेगळा होणे कमी परिणामकारक आहे. त्याचवेळी महाराष्ट्रातील विरोधक खूपच कमकुवत झाले आहेत, परंतु बिहारमध्ये परिस्थिती वेगळी आहे. नितीशकुमार हे भाजपमध्येअसल्याने त्यांचे अल्पसंख्याक मत वाचवण्यासाठी काम करत आहेत. हेच कारण आहे की जेडीयूने एनडीएत असूनही तीन तलाक, कलम ३७० आणि ३५ ए मध्ये सरकारच्या बाजूने मतदान केले नाही.

भाजप नितीश यांना नेते मानायला तयार नाहीत :
बिहारच्या राजकारणात नितीश यांनी भाजपबरोबर राहणे आणि स्वत:ला मोठा भाऊ म्हणून ठेवणे हे एक मोठे आव्हान आहे. तर दोन्ही पक्षांचा राजकीय अजेंडा मात्र वेगळा आहे. त्याचबरोबर नितीश यांची मोठी व्होट बँक भाजपसमवेत जाण्यास तयार नाही. लोकसभा निवडणुकीत दोन्ही आघाड्यांनी ४० पैकी ३९ जागा जिंकल्या असल्या तरी राज्य निवडणुकीत भाजपाकडेही मोठी व्होट बँक असून भाजपचे नेते नितीश यांना नेता मानण्यास तयार नाहीत.

अशा परिस्थितीत आरजेडीने नितीशकुमारांना विरोधाचा चेहरा देऊन त्यांची अडचण वाढविली आहे. यातून आरजेडीला हा संदेश अल्पसंख्याक मतदारांना द्यायचा आहे की भाजपला रोखण्यासाठी ते कोणतीही किंमत मोजायला तयार आहेत. परंतु नितीश मात्र भाजप सोडण्यास तयार नाहीत.

आरोग्यविषयक वृत्त –