रोहित शर्मासह 5 जणांचं ‘खेलरत्न’ कन्फर्म, कुस्तीपटू राहुल अवारेला अर्जुन पुरस्कार

नवी दिल्ली : क्रिडा मंत्रालयाने शुक्रवारी पूर्वमध्ये खेलरत्न मिळवणारी साक्षी मलिक आणि मीराबाई चानू यांना अर्जुन पुरस्कार न देण्याचा निर्णय घेतला. ज्यामुळे यावर्षी हा पुरस्कार मिळवणार्‍या खेळाडूंची संख्या 27 राहिली आहे. क्रिडा मंत्रालयाने देशातील सर्वोच्च क्रिडा पुरस्कारासाठी ज्या पाच खेळाडूंच्या नावाची शिफारस केली होती, ती स्वीकारण्यात आली आहे. तर महाराष्ट्राचा कुस्तीपटू राहुल अवारेच्या नावाचा समावेश अर्जुन पुरस्काराच्या यादीत आहे.

मागच्या आठवड्यात न्यायमूर्ती (सेवानिवृत्त) मुकुंदकम शर्मा यांच्या नेतृत्वाखालील निवड समितीने अर्जुन पुरस्कारासाठी 29 खेळाडूंची नावे मंत्रालयाकडे पाठवली होती. या यादीत रियो ऑलम्पिकची कांस्य पदक विजेती पेहलवान साक्षी मलिक आणि 2017 ची विश्व वेट लिफ्टिंग चॅम्पियन मीराबाई चानू या दोघींच्या नावाचा समावेश होता. परंतु या दोघींना अर्जुन पुरस्काराने सन्मानित करण्याचा अंतिम निर्णय क्रिडा मंत्री किरण रिजिजू यांच्या सोडण्यात आला होता.

या दोन्ही खेळाडूंना यापूर्वी देशाचा सर्वोच्च खेलरत्न (साक्षी-2016, मीराबाई-2018) मिळाला आहे. या दोघींचे नाव यादीत समाविष्ट करण्यावर टीका सुद्धा झाली होती.

या खेलरत्न मिळवणार्‍या पाच खेळाडूंमध्ये क्रिकेटर रोहित शर्मा, पेहलवान विनेश फोगाट, पॅरालॉम्पिक सुवर्ण पदक विजेता मरियप्पन थंगवेलु, टेबल टेनिस खेळाडू मनिका बत्रा आणि महिला हॉकी टीमची कर्णधार रानी रामपाल यांचा समावेश आहे. मंत्रालयाने प्रसिद्धी पत्रकार असे नमूद केले आहे.

कोविड-19 महामारीमुळे प्रथमच पुरस्कार वितरण सोहळा 29 ऑगस्टला राष्ट्रीय खेळदिनी व्हर्च्युअल आयोजित करण्यात येईल. राष्ट्रपती भवनात हा सोहळा नेहमी आयोजित करण्यात येतो.

मनिका बत्राबाबत प्रश्न उपस्थित
पुरस्कारांच्या मापदंडात खेळाडूच्या मागील चार वर्षातील कामगिरीचा सहभाग होता. मनिका बत्राची खेलरत्नसाठी शिफारस झाल्यानंतर यावरून प्रश्न उपस्थित झाला आहे. कारण तिने 2018 मध्ये गोल्ड कोस्ट राष्ट्रमंडल खेळांमध्ये सुवर्ण पदक जिंकणे आणि त्यासाठी अर्जुन पुरस्कार मिळवल्यानंतर कोणतीही उल्लेखनिय कामगिरी केलेली नाही. तिची जागतिक श्रेणी सुद्धा 63 वर घसरली आहे. परंतु, मंत्रालयाने स्वत:चाच नियम डावलून तिची शिफारस नामंजूर न करण्याचा निर्णय घेतला.

रानी रामपालच्या नावाच्या शिफारशीवर प्रश्न उपस्थित केले जात आहेत. तिने भारतीय हॉकी टीमला टोकीयो ऑलम्पिकला तिकिट मिळवण्यात महत्वाची भूमिका निभावली. एवढेच नव्हे, तिच्या नेतृत्वाखाली टीमने 2018 आशियाई खेळात रजपदक मिळवले.

क्रिडाप्रेमींनी शिवा केशवनला अर्जुन पुरस्कार दिल्याबद्दल समाधान व्यक्त केले आहे. क्रिडा मंत्रालयाने स्वदेशी खेळांना मान्यता देण्यावर भर दिला आहे आणि याचा परिणाम म्हणून खो खेळाडू सुधाकर सारिका काळेला अर्जुन पुरस्काराच्या यादीत जागा मिळाली.

पुरस्कार विजेत्यांची यादी –

राजीव गांधी खेलरत्न पुरस्कार : रोहित शर्मा (क्रिकेट), विनेश फोगाट (कुस्ती), मनिका बत्रा (टेबल टेनिस), रानी रामपाल (हॉकी), मरियप्पन थंगवेलु (पॅरा अ‍ॅथलीट).

द्रोणाचार्य पुरस्कार (जीवन श्रेणी) : धर्मेंद्र तिवारी (नेमबाजी), पुरुषोत्तम राय (अ‍ॅथलेटिक्स), शिव सिंह (बॉक्सींग), रोमेश पठानिया (हॉकी), कृष्ण कुमार हुड्डा (कबड्डी), विजय भालचंद्र मुनीश्वर (पॅरा पॉवरलिफ्टिंग), नरेश कुमार (टेनिस), ओम प्रकाश दहिया (कुस्ती).

नियमित श्रेणी : जूड फेलिक्स सेबेस्टियन (हॉकी), योगेश मालवीय (मल्लखांब), जसपाल राणा (नेमबाजी), कुलदीप कुमार हांडू (वुशु), गौरव खन्ना (पॅरा बॅडमिंटन)

अर्जुन पुरस्कार : अतनु दास (नेमबाजी), दुती चंद (अ‍ॅथलेटिक्स), सात्विक साईराज रंकीरेड्डी (बॅडमिंटन), चिराग चंद्रशेखर शेट्टी (बॅडमिंटन), विशेष भृगुवंशी (बास्केटबॉल), सूबेदार मनीष कौशिक (बॉक्सिंग), लवलीना बोरगोहेन (बॉक्सिंग), ईशांत शर्मा (क्रिकेट) दीप्ति शर्मा (क्रिकेट), सावंत अजय अनंत (अश्वारोहन), संदेश झिंगन (फुटबॉल), अदिती अशोक (गोल्फ), आकाशदीप सिंह (हॉकी), दीपिका (हॉकी), दीपक हुड्डा (कबड्डी), काले सारिका सुधाकर (खो खो), दत्तू बबन भोकानल (रोइंग), मनु भाकर (नेमबाजी), सौरभ चौधरी (नेमबाजी), मधुरिका सुहास पाटकर (टेबल टेनिस), दिविज शरण (टेनिस), शिवा केशवन (हिवाळी खेळ), दिव्या काकरान (कुस्ती), राहुल अवारे (कुस्ती), सुयश नारायण जाधव (पॅरा स्विमिंग), संदीप (पॅरा अ‍ॅथलेटिक्स) मनीष नरवाल (पॅरा नेमबाजी).

ध्यानचंद पुरस्कार : कुलदीप सिंह भुल्लर (अ‍ॅथलेटिक्स), जिंसी फिलिप्स (अ‍ॅथलेटिक्स), प्रदीप श्रीकृष्ण गंधे (बॅडमिंटन), तृप्ती मुर्गंडे (बॅडमिंटन), एन. उषा (बॉक्सिंग), लाखा सिंह (बॉक्सिंग), सुखविंदर सिंह संधू (फुटबॉल), अजीत सिंह (हॉकी), मनप्रीत सिंह (कबड्डी), जे रंजीथ कुमार (पॅरा अ‍ॅथलेटिक्स), सत्यप्रकाश तिवारी (पॅरा बॅडमिंटन), मंजीत सिंह (रोइंग), स्वर्गीय श्री सचिन नाग (जलतरण), नंदन पी बाल (टेनिस), नेत्रपाल हुड्डा (कुस्ती).