नवीदिल्लीमहत्वाच्या बातम्या

‘कोरोना’शी लढाईत दिल्लीची कमाल, 10 महिन्यांनंतर राजधानीत आज एकही मृत्यू नाही

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – गेल्या वर्षापासून सुरू असलेल्या कोरोना सोबतच्या युद्धा दरम्यान दिल्लीसाठी अत्यंत आनंददायक बातमी आहे. जवळपास 10 महिन्यांपासून कोरोनाच्या विध्वंसानंतर, आज गेल्या चोवीस तासांत दिल्लीत कोरोना विषाणूमुळे एकही मृत्यू झाला नाही. हे आपल्या सर्वांच्या प्रयत्नांचे फळ असल्याचे सांगून दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी दिल्लीतील लोकांचे कौतुक केले.

दिल्लीच्या आरोग्य विभागाच्या आकडेवारीनुसार, राजधानीत गेल्या 24 तासांत कोरोमुळे एकही मृत्यू झाला नाही. दहा महिन्यांनंतर दिल्लीतील कोरोना मृतांचा आकडा शून्यावर येण्याची ही पहिली वेळ आहे. ऑगस्ट, सप्टेंबरमध्ये देश आणि दिल्लीमध्ये कोरोनाचा कहर पाहिलेल्या लोकांसाठी ही खूप सकारात्मक बातमी आहे.

दरम्यान, गेल्या 24 तासांत दिल्लीत 100 नवीन कोरोना प्रकरणे नोंदली गेली आहेत. दिल्लीत कोरोना संसर्गाचे प्रमाण एक टक्क्यापेक्षा कमी घसरत 0.18 टक्क्यांवर आले आहे. तर, दिल्लीतील रिकव्हरी रेट 98.12 टक्के आहे. हा आत्तापर्यंतचा सर्वात मोठा आकडा आहे. दिल्लीत
सक्रिय कोरोना रुग्णांचे प्रमाण 0.16 टक्के आहे. हा आत्तापर्यंतचा सर्वात कमी आकडा आहे.

दिल्लीत सक्रिय कोरोना रूग्णांची संख्या 1052 आहे. होम क्वारंटाइनमध्ये 441 रुग्ण आहेत. 24 तासांत, 100 रूग्णांसह संक्रमणाची एकूण संख्या 6,36,260 पर्यंत वाढली आहे. दिलासादायक बाब म्हणजे दिल्लीत 24 तासांत 144 रुग्ण बरे झाले आहेत. अशा प्रकारे, कोरोनाला पराभूत करणार्‍यांची एकूण आकडेवारी 6,24,326 वर पोहोचली आहे.

दिल्लीत कोरोना मृत्यूचे प्रमाण 1.71 टक्के आहे. दिल्लीमध्ये कोरोनाने आतापर्यंत 10,882 लोकांचा मृत्यू झाला आहे. दिल्लीतील कंटेन्टमेंंट झोनची संख्या 950 आहे.

दिल्लीकरांसाठी सुखद बातमी – केजरीवाल
दिल्लीकरांसाठी ही चांगली बातमी आहे, असे दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी म्हटले आहे. आज दिल्लीत कोरोनामुळे एकही मृत्यू झाला नाही. दिल्लीच्या जनतेचे अभिनंदन. कोरोनाची प्रकरणेही कमी झाली आहेत, लस मोहीम वेगवान सुरू आहे. दिल्लीकरांनी कोरोनाविरुद्ध अतिशय कठोर संघर्ष केला आहे. दरम्यान आपल्याला अद्यापही पूर्ण काळजी घ्यावी लागेल.

Back to top button