सुप्रीम कोर्टात वकिली करणार्‍या महिलेचा खून, तपासादरम्यान पोलिस ‘हैराण-परेशान’

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – नोयडा सेक्टर २१ मधील सुप्रीम कोर्टाच्या महिला वकिलाची हत्या करण्यात अली होती. मात्र अजूनही या हत्येचा उलगडा करण्यात पोलिसांना यश आलेले नाही. घटनास्थळावरील परिस्थिती पाहून पोलिसांना ही हत्या लुटमारीच्या उद्देशाने करण्यात आली असल्याचे वाटत आहे. त्याचबरोबर पोलिस संपत्तीचा काही वाद होता का या दिशेने देखील तपास करत आहेत. हत्या करणाऱ्यांनी  सीसीटीव्ही आणि डीव्हीआर देखील लांबवल्याने पोलिसांना तपासात अडथळे येत आहेत.

सुप्रीम कोर्टामध्ये वकील असलेल्या कुलजीत कौर या नोयडा सेक्टर २१ मधील बी-२१८ या घरात एकट्याच राहत होत्या. त्यांचे पती कॅप्टन नवजोत सिंह कौर यांचे मागील वर्षी निधन झाले आहे. मंगळवारी रात्री कुलजीत यांची छोटी बहीण दिव्या बजाज यांनी त्यांच्या फोनवर खूप फोन केले मात्र कुणीही उचलला नाही. त्यानंतर त्यांनी शेजाऱ्यांना फोन करून घरी पाहायला सांगितले असता त्यांना कुलजीत या मृतावस्थेत आढळल्या. घटनास्थळी पोहोचल्यानंतर पोलिसांना तपासात असे आढळून आले कि, त्यांच्या घरी काम करणारे एक नेपाळी जोडपे गायब आहे. त्याचप्रमाणे घरातील सामान देखील अस्ताव्यस्त पडले होते. त्याची होंडा सिटी कार देखील गायब होती. त्यामुळे त्या नेपाळी दाम्पत्याने त्यांचा खून केला आहे कि यामागे संपत्तीचा काही वाद आहे, त्यादिशेने पोलीस तपास करत आहे.

एक आठवड्यापूर्वीच ठेवले होते कामावर  

कुलजीत या एकट्याच असल्याने त्यांनी एका नेपाळी दाम्पत्याला आपल्या घरी कामासाठी ठेवले होते. त्यांचे वय साधारण २५ वर्षांच्या आतच असेल. यापैकी महिलेचे नाव स्नेहा असे आहे तर तिच्या पतिचे नाव कळालेले नाही.

संपत्तीचा वाद 

पोलीस त्या दिशेने देखील आपला तपास करत असून कुलजीत या राहत असलेल्या घराविषयी सध्या सुप्रीम कोर्टात वाद सुरु होता. त्यांच्या पतींनी आपल्या बहीण भावाविरोधात याविषयी खटला दाखल केला होता.  दरम्यान, फॉरेन्सिक टीम नमुने गोळा करत असून या संदर्भात हत्येचा गुन्हा दाखल करण्यात आला असून लवकरच आरोपींना अटक करण्यात येईल असा विश्वास पोलिसांनी व्यक्त केला आहे.  

अशा प्रकारेदेखील खावू शकता भाज्या, होतील अनेक फायदे

‘या’ कारणामुळे पावसाळ्यात ‘डोळ्यांच्या समस्या’ निर्माण होतात

दररोज ‘हळदीचे पाणी’ घ्या आणि आश्चर्यकारक फायदे मिळवा

लुक बदलायचायं ? मग ‘या’ मेकअप टीप्स फॉलो करा

निद्रानाशाच्या गंभीर समस्येवर करा ‘हे’ घरगुती सोपे उपाय

भटक्या विमुक्तांचा जिल्हाधिकारी कार्यालयावर गाढव मोर्चा !

धक्कदायक : बौद्धांना मदत केल्यास १०हजार रु. दंड ठोठवणार, गावात दवंडी देत जातीयवाद्यांनी टाकला बहिष्कार

ग्रामीण भागातील शेतकरी, दलित, अदिवासी समाजातील विद्यार्थ्यांमध्ये प्रचंड ऊर्जा- दिनकर पावरा