Nokia नं 5G स्मार्टफोनसह लॉन्च केले 2 भन्नाट डिव्हाइस, जाणून घ्या किंमत आणि फिचर्स

पोलीसनामा ऑनलाइन – नोकिया 3.4 ट्रिपल रियर कॅमेरासह होल-पंच डिस्प्ले डिझाइनसह सादर करण्यात आला आहे, तर दुसरीकडे नोकिया 2.4 ड्युअल रियर कॅमरा व वॉटरड्रॉप स्टाइल डिस्प्ले नॉचसह उपलब्ध करण्यात आला आहे.

3/32 जीबी, 3/64 जीबी आणि 4/64 जीबी मेमरी व स्टोरेजसह नोकिया 3.4 ऑक्टोबरच्या सुरूवातीला उपब्ध करून दिला जाईल, ज्याची किंमत 159 यूरो किंवा 13,677.45 रुपये असेल. नोकिया 2.4 सप्टेंबरच्या शेवटी लाँच करण्यात येईल. 2/32 जीबी आणि 3/64 जीबी मेमरी आणि स्टोरेजच्या या फोनची प्रारंभिक किंमत 119 यूरो किंवा 10,236.59 रुपये ठेवण्यात आली आहे.

नोकिया 8.3 5जी
नोकिया 8.3 5जी एचएमडीचा पहिला 5जी स्मार्टफोन आहे. हा फोन 23 सप्टेंबरपासून अमेरिकेत अमेझॉनवर उपलब्ध करण्यात आला आहे.

8+128जीबी वेरियंटची किंमत 700 डॉलर आहे. यामध्ये 6.81 इंच एलसीडी, स्नॅपड्रॅगन 76जी चिपसेट, 64एमपी मेन कॅमरा, 4500एमएएच बॅटरी आणि 18वॉट फास्ट चार्जिंग सारखे फीचर्स आहेत.

नोकिया 3.4
नोकिया 3.4 मध्ये स्नॅपड्रॅगन 460 चिपसेट आहे. हा अँड्रॉयड 10 वर रन करतो. याचा डिस्प्ले 6.39 इंच एलसीडी आहे. याचा सेल्फी कॅमेरा 8 मेगापिक्सलचा आहे.

रियर कॅमेरा 13 मेगापिक्सलचा आहे. इसकी बॅटरी 4000एमएएचची आहे आणि ती 10वॉट चार्जरला सपोर्ट करते. यामध्ये 3.5एमएम हेडफोन जॅक आणि एफएम रेडियो रिसीव्हर आहे.

नोकिया 2.4
नोकिया 2.4 मध्ये 6.5 इंच एलसीडी स्क्रीन आहे. यात 4500एमएएचची बॅटरी आहे, जी 5वॉट चार्जरला सपोर्ट करते. हा फोन मीडियाटेक हेलियो पी22 चिपसेटद्वारे संचालित ओ. याचा रियर कॅमेरा 13 मेगापिक्सल आहे. सेल्फी कॅमेरा 5 मेगापिक्सलचा आहे. याच्या बॅकला फिंगरप्रिंट रीडर देण्यात आला आहे. हा एनएफसीला सुद्धा सपोर्ट करतो. फोनमध्ये 3.5एमएम हेडफोन जॅक आणि एफएम रेडिओ आहे.