भाग्यवंत ! आनंद गुरव यांना एकाच मतदार संघातून 2 पक्षांनी दिली उमेदवारी

कोल्हापूर : पोलीसनामा ऑनलाइन – पक्षाकडून उमेदवारी मिळावी यासाठी इच्छूक उमेदवार पक्षश्रेष्ठींना खूष करण्याचा प्रयत्न करत असतात. आपण पक्षासाठी किती झटलो आणि झटत आहे हे दाखवून देत उमेदवारी पदरात पाडून घेत आहे. यंदाच्या विधानसभा निवडणुकीत सर्वच पक्षात इच्छुकांची गर्दी पहायला मिळत आहे. मात्र, कोल्हापूरच्या करवीमध्ये उमेदवार आपल्याकडे खेचण्यासाठी दोन पक्षांमध्ये रस्सीखेच लागल्याचे दिसून येत आहे.

आप आणि वंचित बहुनज आघाडीने एकाच उमेदवाराला उमेदवारी दिली आहे. आप आणि वंचित बहुजन आघाडीने आनंद गुरव यांना आपापल्या पक्षाकडून उमेदवारी दिली आहे. सोमवारी (दि. २३) आपने आपल्या उमेदवारींची यादी जाहीर केली आहे. या यादीमध्ये गुरव यांना कोल्हापूर येथील करवीर मतदार संघाची उमेदवारीची घोषणा केली. त्यानंतर आज वंचितने देखील आपल्या उमेदवारांच्या नावाची घोषणा केली आहे. यामध्ये वंचितने गुरव यांना करवीरमधूनच उमेदवारी जाहीर केली आहे.

दरम्यान वंचितकडून उमेदवारी जाहीर झाल्यानंतर आनंद गुरव नॉट रिचेबल झाल्याने आपने त्यांची उमेदवारी रद्द केली आहे. आपने करवीर मतदारसंघातून आनंद गुरव यांच्या नावाची घोषणा केली होती. आज वंचित बहुजन आघाडीने जाहीर केलेल्या यादीमध्येही आनंद गुरव यांचे नाव असल्याने सर्वांच्या भुवया उंचावल्या आहेत. महत्वाचे म्हणजे वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर यांनी काही दिवसांपूर्वी इच्छुकांची कमतरता नसल्याचा दावा केला होता. तसचे भाजपमधूनही अनेकांच्या उमेदवारीसाठी फोन येत असल्याचे म्हटले होते.

कोण आहेत आनंद गुरव ?

डॉ. आनंद गुरव हे आयुर्वेदिक डॉक्टर आणि बालरोग तज्ज्ञ असून त्यांची वैद्यकीय विषयावर अनेक पुस्तके प्रकाशित झाली आहेत. डॉ. गुरव हे श्री रसाई हॉस्पीटल चालवतात. कोणत्याही पक्षाने उमेदवारी दिली तरी निवडणूक लढवायची असे त्यांनी ठरवले असून त्यांनी उमेदवारी जाहीर होण्यापूर्वीच प्रचाराला सुरुवात केली आहे. त्यांनी करवीर विधानसभा मतदारसंघामध्ये अनेक ठिकाणी आरोग्य शिबीरे घेऊन आपल्या प्रचाराचा नारळ फोडला आहे.

 

Visit : policenama.com