उत्तर कोरियाचा ‘तानाशाह’ किम जोंग यांचे निधन ?

प्योंगयांग : वृत्तसंस्था – उत्तर कोरियाचे राष्ट्राध्यक्ष किम जोंग उन यांचे निधन झाले असल्याचे वृत्त हाँगकाँगमधील वृत्तवाहिनीने दिले आहे. या वृत्तवाहिनीच्या वृत्तामुळे खळबळ उडाली आहे. मात्र, अमेरिका, दक्षिण कोरिया शिवाय कोणत्याही देशांनी निधनाच्या वृत्तावर कोणतीही माहिती, प्रतिक्रिया दिलेली नाही. किम जोंग उन यांच्या प्रकृतीवर उपचारासाठी चीनने नुकतेच एक वैद्यकीय पथक पाठवले होते.

किम जोंग उन यांच्यावर दोन आठवड्यापूर्वी कार्डियोवेस्क्युलेरची शस्त्रक्रिया झाली. त्यानंतर त्यांची प्रकृती खालावल्याची माहिती समोर आल्याने जगभरात खळबळ उडाली होती. चीनने देखील एक वैद्यकीय पथक उत्तर कोरियाला पाठवले. हे पथक किम यांच्या प्रकृतीची तपासणी करण्याबरोबरच डॉक्टरांसोबत चर्चा करणार असल्याची माहिती होती. हाँगकाँग सॅटेलाइट टीव्हीने किम जोंग उन यांचे निधन झाल्याचे वृत्त दिले. तसेच मृतदेहाचे फोटो देखील प्रकाशित केले. मात्र, याबाबत काहीच सत्यता पडताळण्यात आलेली नाही. याला कोणत्याही देशांनी याबाबत अधिकृत माहिती दिलेली नाही.

किम यांची प्रकृती मागील काही दिवसांपासून ठिक नव्हती. लठ्ठपणाचा त्रास होताच शिवाय अति धुम्रपानाच्या आहारी ते गेले होते. किम हे 11 एप्रिल रोजी दिसले होते. मात्र नव्हे किम यांचे आजोबा आणि उत्तर कोरियाचे दिवंगत नेते किम उल संग यांच्या जयंतीनिमित्त होणाऱ्या 15 एप्रिलच्या कार्यक्रमात ते उपस्थित राहिले नव्हते. त्यानंतर त्यांच्या प्रकृतीबाबत जगभरात चर्चा सुरु झाली.