‘ईव्हीएम’ला घाबरत नाही, फक्त गडबड करू नका खा. अमोल कोल्हे यांचा सरकारला सवाल

अहमदनगर : पोलीसनामा ऑनलाइन – मुख्यमंत्र्यांना एक सांगायचे आहे, तुम्ही सांगताय पुढची सत्ता आमची येणार आहे. यावेळी फक्त घड्याळ दाबले जाणार आहे. मतदान यंत्रात फक्त गडबड करू नका. आम्ही मतदान यंत्राला घाबरत नाही. होऊ द्या मतदान यंत्राने निवडणूक, असे आव्हान राष्ट्रवादीचे खासदार अमोल कोल्हे यांनी सरकारला दिले.

जामखेड येथे आयोजित शिवराज्य यात्रेत बोलताना खा. कोल्हे म्हणीले की, आम्ही भगवा झेंडा हातात घेतला, तर तुम्हाला प्रश्न पडलाय? पण शिवरायांचा भगवा हा आमचा भगवा आहे. राज्यात शेतकरी आत्महत्या वाढतात, बेरोजगारी वाढलीय, अत्याचार वाढले, कारखाने बंद होताहेत, कुठे नेऊन ठेवलाय महाराष्ट्र माझा? असा प्रश्न विचाराला पाहिजे. यांची मुजोरी वाढली आहे. शिवाजी महाराजांपेक्षा स्व:ताला मोठे समजायला लागलेल्या या मुजोरांना काय म्हणायचे?

शाहू-फुले-आंबेडकर आणि शिवाजी महाराज यांना वेगळे करण्याचे काम जे तुम्ही केले, ते आम्ही एकत्र करण्याचे काम आम्ही करतोय. विमा कंपन्यांना घामाचे पैसे देऊन मोठे पाप हे सरकार करतेय. 16 कोटी रुपये विमा कंपनीला दिले मात्र शेतकऱ्याला फुटकी कवडी मिळाली नाही, असेही कोल्हे म्हणाले.

मंत्री मेकअप करून फिरतोय
मेकअप करून मंत्री फिरतोय. मात्र मतदारांना काही मिळाले का नाही, असा टोला कोल्हे यांनी राम शिंदे यांना लगावला आहे. पाच वर्षात फक्त घोषणांचा पाऊस आहे. मात्र कर्जत-जामखेडमध्ये पिण्यास पाणीच नाही. हाच का विकास? जलयुक्त शिवारमध्ये पैसे मुरले का, पाणी मुरले हे मुख्यमंत्र्यांनी सांगावे, असेही कोल्हे म्हणाले

आरोग्यविषयक वृत्त –