भारतापेक्षाही अमेरिका, सिंगापूरसह अनेक देशांचे वाहतूक नियम ‘कठोर’, ‘रुल्स’चं उल्लंघन केल्यास 7 लाखांपर्यंत ‘फाईन’ !

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – राजस्थान, बंगालसारखी काही राज्ये वगळता १ सप्टेंबरपासून मोटार वाहन अधिनियम -२०१९ लागू झाला आहे. त्याअंतर्गत वाहतुकीचे उल्लंघन केल्याबद्दल भारी दंड आकारला जात आहे. नवीन नियमापूर्वी, दंडाची सरासरी रक्कम कमी होती, नवीन नियमांनुसार ती अनेक पटींनी वाढविली गेली आहे. काही लोक यास विरोध दर्शवित आहेत, परंतु अमेरिका, सिंगापूर, ब्रिटन, रशिया या देशासह अनेक देशांमध्ये वाहतुकीचे नियम मोडण्याबद्दल कठोर कारवाईची तरतूद आहे. जगातील बर्‍याच देशांमध्ये वाहतुकीचे नियम कठोर आहेत. चला त्या नियमांबद्दल जाणून घेऊयात :

भारतातील दंड :
नव्या नियमांनुसार, आता मोबाईलवर बोलणे, वाहतूक कोंडी करणे आणि चुकीच्या दिशेने वाहन चालविणे या गोष्टी वाहन चालविताना धोकादायक ड्रायव्हिंग प्रकारात ठेवण्यात आल्या आहेत.

यापूर्वी विना परवाना वाहने चालविण्यावर एक हजार रुपये दंड आकारला जात होता, तर आता तो ५ हजार रुपये करण्यात आला आहे.

सीट बेल्ट नसल्यास १०० रुपयांऐवजी १००० रुपये दंड आकारला जाईल.

आता मोटार वाहन अधिनियम -२०१९ नुसार वाहन चालवताना मोबाईलवर बोलताना पकडले गेले तर तुम्हाला ५००० रुपये दंड भरावा लागेल जो आधी एक हजार रुपये होता.

ड्रायव्हरला आता मद्यप्राशन करून वाहन चालविण्यास सहा महिने तुरूंग आणि दहा हजार रुपये दंड भरावा लागेल.

हेच दंड बाहेरील देशांत किती आहेत जाणून घेऊयात

अमेरिका :
नॉन-सीट बेल्ट : यूएसमध्ये, जर तुम्ही सीट बेल्टशिवाय वाहन चालवत असाल तर तुम्हाला २५ डॉलर (सुमारे ₹ १,७९९.९६) दंड भरावा लागेल.

ड्रायव्हिंग लायसन्स नसणे :
ड्रायव्हिंग लायसन्सविना वाहन चालविण्याकरिता ५००-१,००० डॉलर्स म्हणजे सुमारे ७२ हजार रुपये दंड आणि तीन वर्षांसाठी ड्रायव्हिंग लायसन्स जप्त करण्याची तरतूद आहे. याशिवाय तुरुंगवासाची शिक्षा देखील असू शकते.

हेल्मेटची न वापरणे :
हेल्मेट न घालण्यासाठी भारतात १००० रुपये दंड आहे. अमेरिकेतील इलिनॉय, आयोवा आणि न्यू हॅम्पशायरसारख्या काही राज्यांना हेल्मेटची सक्ती नाही. तथापि, बहुतेक राज्यात हेल्मेट घालणे आवश्यक आहे. तेथे हेल्मेटशिवाय वाहन चालविल्यास ३०-३०० डॉलर (सुमारे ₹ २,१००-२१,७००) दंड आकारला जाऊ शकतो. अलाबामा किंवा आर्कान्सासारख्या राज्यात तुम्हाला तुरूंगातही टाकले जाऊ शकते.

ड्रिंक अँड ड्राईव्ह :
दारू प्यायल्यानंतर वाहन चालवल्यास आता भारतात १०,००० रुपयांपर्यंत दंड आकारला जाईल. अमेरिकेत वर्षातून ९० दिवसांपासून १ वर्षांपर्यंत परवाने रद्द केले जातात.

फोनवर बोलताना वाहन चालविणे :
अमेरिकेत वाहन चालवताना तुम्ही मोबाईल फोनवर बोलत असाल तर तुम्हाला १०,००० डॉलर्स (७.२३ लाख रुपये) दंड भरावा लागेल आणि त्यासाठी एक वर्षापर्यंत तुरुंगवासाची तरतूद आहे. अमेरिकेच्या आर्कान्सामध्ये रात्री ९ नंतर रेस्टॉरंटच्या बाहेर हॉर्न वाजवण्यास मनाई आहे. यावर कडक कारवाईही केली जाते.

सिंगापूर :
गेल्या वर्षी जुलै महिन्यात सिंगापूर ट्राफिक पोलिसांनी प्रकाशित केलेल्या बेसिक थिअरी ऑफ ड्रायव्हिंग (नववी आवृत्ती) नुसार, वाहनविषयक नवीन नियमावली सादर केली आहे.

वाहन चालवताना मोबाईल फोन वापरणे :
सहा महिन्यांपर्यंत जेल आणि १००० डॉलर (सुमारे ७१,९९६ रुपये) दंड

ड्रिंक अँड ड्राईव्हवर –
नशेत असताना वाहन चालवताना पकडल्याप्रकरणी सिंगापूरला ५००० डॉलर्स (सुमारे ३,५९,८२२ रुपये) आणि ६ महिने कारावासाचा दंड आहे. दुसऱ्यांदा नियम मोडल्यास १०,००० डॉलर (सुमारे ७ लाख रुपये) आणि / किंवा १२ महिन्यांच्या तुरूंगवासाचा दंड ठोठावला जातो.

ड्रायव्हिंग परवान्याशिवाय वाहन चालविणे –
५००० डॉलर (३ लाखाहून अधिक रुपये) दंड आणि 3 महिन्यांपर्यंतच्या तुरूंगवास.

सीट बेल्टमध्ये नसणे –
१२० डॉलर्स (अंदाजे ८,६०० रुपये) दंड यासह ३ महिन्यांपेक्षा जास्त कालावधीसाठी तुरूंगवास

आरोग्यविषयक वृत्त –