Not Receiving Aadhaar OTP | आधार कार्ड मोबाईल क्रमांकसोबत लिंक करुनही OTP येत नाही? मग ‘हे’ करा काम, जाणून घ्या

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – Not Receiving Aadhaar OTP | आधार कार्ड (Aadhaar Card) हे देशातील नागरीकांचं महत्वाचं कागदपत्रं झालं आहे. खासगी आणि शासकीय कामासाठी आधार कार्डची आवश्यकता असते. दरम्यान सरकार वेळोवेळी आधार लिंक करण्यासाठी सुचना करत असते. त्यासाठी कालावधी देखील वाढवण्यात आला आहे. दरम्यान महत्वाची बाब म्हणजे यूआयडीएआय (UIDAI) ही आधार कार्ड जारी करणारी सरकारी एजन्सी आहे. आधारसोबत मोबाईल क्रमांक आणि ई-मेल अ‍ॅड्रेस लिंक (Mobile Number And E-mail Address link) केल्यास तुम्हाला आधार ऑनलाईन सेवांचा लाभ मिळेल तसेच अलर्ट मिळत राहतील. अर्थात तुमचा आधार नंबर तुम्हाला माहीत नसताना इतरत्र वापरला जात असेल अथवा त्यावर काही व्यवहार होत असतील तर तुम्हाला लगेच सावधान सुचना दिल्या जातात. (Not Receiving Aadhaar OTP)

 

एका हिंदी वृत्तवाहिनीने दिलेल्या माहितीनुसार, मोबाईल नंबर आणि ई-मेल अपडेट न केल्यास हा अलर्ट (Alert) मिळणार नाही आणि तुमची फसवणूक होऊ शकते. आधारसोबत मोबाईल नंबरची नोंदणी केल्याने तुम्हाला सरकारी सेवांसोबतच निमसरकारी सेवांचा लाभ मिळेल. आधारमध्ये मोबाईल नंबर अपडेट करण्याचे अनेक लाभ आहेत. आधार कार्ड आणि मोबाईल नंबर लिंक असतील तर आधार कार्डवरील पत्ता बदलू शकता, आधार डाउनलोड करू शकता आणि आयकर परतावा व्हेरिफाय करू शकता. याशिवाय बँक खातं आणि एनपीएस खाते उघडू शकता. (Not Receiving Aadhaar OTP)

 

आधार कार्ड व्हेरिफाय करण्यासाठी –
तुम्हाला ई-आधार किंवा आधार लेटर किंवा आधार पीव्हीसी कार्डवरील (PVC Card) QR कोड स्कॅन करावा लागेल. पण, जर तुम्ही तुमच्या आधारमध्ये दिलेला मोबाईल नंबर बदलला असेल तर तो तुम्ही अपडेट करणं आवश्यक. आधार कार्डवरील मोबाईल नंबर, पत्ता आणि इतर माहिती चूक आहे की बरोबर याची खात्री करायची असेल तर तुम्ही https://myaadhaar.uidai.gov.in/verify-email-mobile लिंकला भेट देऊ शकता. आधारवरील नंबर बदलल्यानंतर OTP येत नाही, अशी अनेकांची तक्रार असते.

दरम्यान, मोबाईलचे नेटवर्क चांगले नसेल तर, OTP येण्यास अडचणी येतात, असं UIDAI सांगते.
तुम्हाला नेटवर्कची समस्या असेल तर T-OTP अर्थात टाईम बेस्ड OTP चा वापर करा.
यासाठी तुम्हाला मोबाईलमध्ये mAadhaar अ‍ॅप डाउनलोड करावं लागणार आहे.
तर mAadhaar वर येणाऱ्या Time based OTP च्या सहाय्याने तुम्ही आधारशी (Aadhaar Card) लिंक केलेल्या ऑनलाईन सेवांचा लाभ घेऊ शकता.

 

दरम्यान, मोबाईल नंबर अपडेट करण्यासाठी बायोमेट्रिक ऑथेंटिकेशन (Biometric Authentication) आवश्यक आहे.
यासाठी तुम्हाला तुमच्या जवळच्या नावनोंदणी केंद्राला भेट द्यावी लागेल. तर जवळचं केंद्र शोधण्यासाठी तुम्ही https://uidai.gov.in ला भेट देऊ शकता.
दरम्यान, जर तुम्ही आधार नोंदणी केंद्रावर जात असाल मूळ कागदपत्रांसोबत फोटोकॉपीदेखील आधार केंद्रावर घेऊन जा.
जाण्यापूर्वी, यूआयडीएआय साईटवर तुम्हाला कोणती कागदपत्रे लागतील,अशी माहिती UIDAI दिली.

 

 

Web Title :- Not Receiving Aadhaar OTP | not receiving aadhaar otp due to weak mobile network use your maadhaar app to generate t otp

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

 

Shivsena Saamana Editorial On Kirit Somaiya | ‘अशा मनोविकृतांच्या डोक्यावर कितीही हातोडे मारले तरी त्यांचा मेंदू ठिकाणावर येणार नाही’ – शिवसेना

 

Sanjay Raut On Yashwant Jadhav Diary | यशवंत जाधवांच्या डायरीतील ‘मातोश्री’च्या उल्लेखाबाबत संजय राऊतांचं मोठं विधान !

 

Chandrakant Patil | ‘तिजोरीच्या चाव्या राष्ट्रवादीकडे, शिवसेना – काँग्रेस मंत्र्यांनी फक्त गाड्या फिरवायच्या’ – चंद्रकांत पाटील