गावठी कट्ट्यासह सराईत गुन्हेगार गजाआड

पुणे : पोलीसनामा ऑनलाईन – अंबरनाथ येथील गुन्ह्यांमध्ये पाहिजे असलेल्या एका सराईत गुन्हेगाराला मुंढवा पोलिसांनी गावठी पिस्तूल आणि जिवंत काडतुसांसह अटक केली. त्याच्याकडून पिस्तूल आणि २ जिवंत काडतुसे जप्त करण्यात आली आहेत.

इरफान गुलाब शेख (२७, अंबरनाथ ठाणे) असे अटक कऱण्यात आलेल्याचे नाव आहे. त्याच्यावर अंबरनाथ पोलीस ठाण्यात घरफोडी, दंगल, दुखापत, दरोडा, चोरी असे १८ गुन्हे दाखल आहेत. तसेच त्याच्यावर तडीपारी आणि एमपीडीएची कारवाई करण्यात आली होती. तो दरोडा व दुखापतीच्या २ गुन्ह्यांमध्ये पाहिजे होता.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मुंढवा पोलीस ठाण्यातील पोलीस नाईक जहताप यांना बातमीदारामार्फत माहिती मिळाली की, अंबरनाथ पोलीस ठाण्यातील गुन्ह्यामध्ये पाहिजे असलेला इरफान शेख हा मुंढवा गाव येथे महादेव मंदिराच्या ओट्यावर बसला आहे. त्यानुसार पोलिसांनी त्याला तेथे जाऊन ताब्यात घेतले. त्याची अंगझडती घेतली. त्यावेळी त्याच्याकडे २५ हजार ४०० रुपयांचे एक गावठी बनावटीचे पिस्तूल आणि २ जिवंत काडतुसे मिळून आले. त्यानंतर ते जप्त करण्यात आले.

ही कारवाई अप्पर पोलीस आयुक्त सुनील फुलारी, पोलीस उपायुक्त प्रकाश गायकवाड, सहायक पोलीस आयुक्त सुनील देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक संपत भोसले, पोलीस उपनिरीक्षक अमोल गवळी,, सहायक पोलीस फौजदार, सोनवणे व कर्मचारी यांच्या पथकाने केली.

ह्याही बातम्या वाचा –

सोशल मीडियावरील आचारसंहितेचा पुढाऱ्यांनी घेतला धसका

पुणे-मुंबई प्रवाशांसाठी खुशखबर, डेक्कन क्वीनच्या प्रवासाचा वेळ कमी होणार

पुणे-मुंबई प्रवाशांसाठी खुशखबर, डेक्कन क्वीनच्या प्रवासाचा वेळ कमी होणार