कुख्यात गुन्हेगारांनी पेट्रोल टाकून पेटवले शेजाऱ्याचे घर

औरंगाबाद : पोलीसनामा ऑनलाईन

कुख्यात गुन्हेगारांनी शेजाऱ्याचे घर जाळण्याचा प्रयत्न केला. यामध्ये घराचा दरवाजा जळाला आहे. हा प्रकार मध्यरात्री एक वाजता चिकलठाणा येथील चौधरी कॉलनीत घडला. याप्रकरणी दोन आरोपींविरुद्ध सिडको एमआयडीसी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी अशोक लक्ष्मण बनसोडे (३५, रा. चौधरी कॉलनी) यांनी तक्रार दाखल केली.
[amazon_link asins=’B078124279′ template=’ProductCarousel’ store=’policenama-100′ marketplace=’IN’ link_id=’8f22c1ef-c3a5-11e8-b7a4-9bcd495809a8′]
याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, बनसोडे यांच्या घराजवळच रेकॉर्डवरील कुख्यात आरोपी अनिल अंबादास माळवे व अरुण अंबादास माळवे हे दोघे राहतात. माळवे बंधु मध्यरात्री एक वाजेच्या सुमारास बनसोडे यांच्या घरासमोर आले. त्यांनी पेट्रोल टाकून बनसोडे यांच्या घराच्या दरवाजा पेटवून दिला व तेथून पळून गेले. आग लागल्याचे लक्षात आल्यानंतर बनसोडे यांनी तातडीने आग विझवली. या घटनेत बनसोडे यांचे सात हजार रुपयांचे नुकसान झाले. याप्रकरणी माळवे बंधूविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून एपीआय जाधव हे तपास करत आहेत. अनिल अंबादास माळवे हा पोलिसांच्या रेकॉर्डवरील हिस्ट्रीशीटर आहे. त्याच्या विरुद्ध विविध पोलिस ठाण्यात चोरी, घरफोडी, अवैध दारू विक्री, मारहाण करणे आदी स्वरुपाचे गुन्हे दाखल आहेत. पोलिसांनी यापूर्वी त्याच्यावर हद्दपारीची कारवाई देखील केलेली आहे.
[amazon_link asins=’B078124279,B01LQQHI8I,B06XDKWLJH’ template=’ProductCarousel’ store=’policenama-100′ marketplace=’IN’ link_id=’34db61ad-c3a6-11e8-9af3-3db9f8fce574′]


रायगड नगररचना सहाय्यक संचालक ४० हजाराची लाच घेताना अटक
अलिबाग : अलिबाग येथील रायगड जिल्हा नगररचना कार्यालयातील सहाय्यक संचालकास (वर्ग-1) ४० हजार रुपयांची लाच घेताना रायगड लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे पोलीस उप अधिक्षक विवेक जोशी यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरक्षक किरण बकाले यांच्या पथकाने सापळा रचून शुक्रवारी संध्याकाळी साडेपाच वाजता रंगेहाथ अटक केली आहे. ही कारवाई  नगररचना कार्यालयातील केबीन मध्ये करण्यात आली.

किशोर दत्तात्रेय गिरोल्ला असे लाच घेताना रंगेहाथ अटक करण्यात आलेल्या सहाय्यक संचालकाचे नाव आहे.

अलिबाग तालुक्यांतील म्हात्रोळी गावांतील बांधकांमास भोगवटा दाखल्याकरीता आवश्यक अभिप्राय अहवाल जिल्हाधिकारी कार्यालयास पाठविण्याच्या सरकारी कामा करिता सहाय्यक संचालक (वर्ग-1) किशोर दत्तात्रेय गिरोल्ला यांने या बांधकामाचे बांधकाम संल्लागार यांच्याकडे शुक्रवारी 50 हजार रुपयांच्या लाचेची मागणी केली होती. तडजोडी अंती लाचेची रक्कम 40 हजार रुपयांवर आली. बांधकाम सल्लागार यांनी तत्काळ रायगड लाचलूचपत प्रतिबंधक विभागाच्या कार्यालयात जावून या बाबत रितसर तक्रार दाखल केली. तक्रारी बाबत तत्काळ खातरजमा करुन लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे पोलीस निरक्षक किरण बकाले यांच्या पथकाने नगररचना कार्यालयात आणि गिरोल्ला याच्या केबीन सापळा रचून त्यास 4क् हजार रुपयांची लाच घेताना शिताफीने अटक केली आहे.
[amazon_link asins=’B078124279,B06XTPHR8B,B06XYVJZP5′ template=’ProductCarousel’ store=’policenama-100′ marketplace=’IN’ link_id=’262caf1d-c3a6-11e8-9e8e-a375d423e646′]
सहाय्यक संचालक (वर्ग-1) किशोर दत्तात्रेय गिरोल्ला यांच्या विरुद्ध अलिबाग पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून पूढील तपास पोलीस निरक्षक किरण बकाले हे करित आहेत. सरकारी कामासाठी लोकसेवक लाचेची मागणी करीत असल्यास नागरिकांनी लाचलुचपत प्रतिबंध विभागाकडे तक्रार करावी, असे आवाहन रायगड लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या वतीने करण्यात आले आहे.