खुशखबर ! आता ‘गॅस’धारक निवडू शकणार घराजवळचा किंवा पसंतीचा ‘सप्लायर’

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – आपल्या गॅस वितरकाकडून अनेकदा वेळेवर पुरवठा केला जात नाही. त्यांचे डिलिव्हरी बॉय अधिकचे पैसे मागतात. वितरकाच्या कार्यालयात गेले तर कोणतेही नीट उत्तर मिळत नाही अशा अनेक तक्रारी ग्राहकांकडून गॅस वितरकाविषयी केल्या जातात. पण गॅस वितरक बदल्याविषयी कोणतीही सोय नसल्याने ग्राहकांना नाईलाजाने त्याच्याकडून सेवा घ्यावी लागत होती. पण आता वितरकांची ही मक्तेदारी येत्या ६ महिन्यात टप्प्याटप्प्याने बंद करणार आहे.

पण आता ग्राहकांना आपला गॅस वितरक कोण असावा, याची निवड करता येणार आहे. देशात दिल्ली, मुंबईसह ३४ शहरांतील येत्या सहा महिन्यांत सरकार असे नियम लागू करील की त्यामुळे ही मक्तेदारी कमी कमी होत जाईल. ग्राहकांना त्यांच्या पसंतीचा पुरवठादार (सप्लायर) या नियमांमुळे निवडता येईल, असे वरिष्ठ अधिकाऱ्याने सांगितले.

२००९ मध्ये पेट्रोलियम अँड नॅचरल गॅस रेग्युलेटोरी बोर्डने (पीएनजीआरबी) प्रारंभी ५ वर्षांसाठी विशेष गॅस मार्केटिंगचे हक्क ज्या कंपन्यांनी देशभर शहरांत गॅस वितरणाचे जाळे निर्माण केले आहे त्यांना दिले आहेत. या हक्कांनी या कंपन्यांना २५ वर्षांसाठी त्यांची स्वत:ची पाईपलाईन वापरण्याची मुभा दिली गेली आहे. या कंपन्यांनी अब्जावधी डॉलर्सची जी गुंतवणूक केली आहे ती त्यांना परत मिळण्यास यामुळे मदत होणार आहे. आजही तुलनात्मकदृष्ट्या जो व्यवसाय नवा आहे तो स्पर्धेसाठी बोर्ड लवकरच खुला करणार आहे, असे बोर्डच्या एका सदस्याने सांगितले.

या कंपन्यांनी जेवढी गुंतवणूक केली होती त्यापेक्षा जास्त किमत वसूल केली आहे हे त्यांची नफाक्षमता आणि बाजारातील भांडवलावरून दिसते, असे बोर्डचे सदस्य सतपाल गर्ग यांनी सांगितले. गर्ग यांच्याकडे बोर्डची व्यावसायिक आणि देखरेखीची जबाबदारी आहे. तीन महिन्यांत नियम तयार होतील आणि त्यांची अंमलबजावणी होण्यास आणखी तीन महिने लागतील कारण त्या आधी बोर्ड कंपन्या आणि जनतेचा प्रतिसाद मागविण्यात येणार आहे.

२० आजारांवरील ‘हे’ आहेत रामबाण घरगुती उपाय, आवर्जून लक्षात ठेवा

महिलांनी ‘फिट अ‍ॅन्ड फाईन’ राहण्यासाठी ‘या’ टिप्स फॉलो कराव्यात

तजेलदार त्वचेसाठी ‘चालता-फिरता’ करा ‘हे’ १० ‘छोटे-छोटे’ उपाय !

‘या’ ७ गोष्टींचे सेवन केल्यास डोके आणि शरीर होईल शांत

मेडिटेशन करताना ‘घ्या’ या गोष्टींची काळजी

मासिक पाळीदरम्यान आपल्या त्वचेची ‘अशी’ घ्या काळजी