तुर्कीला बनवायचाय ‘अणूबॉम्ब’, आतंकवाद्यानं ग्रासलेल्या पाकिस्ताननं ‘टेक्नॉलॉजी’ विकली !

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – तुर्की या इस्लामिक देशाने आण्विक हत्यार बनवण्याची इच्छा व्यक्त केली आहे. तुर्कीचे राष्ट्रपती रेसेप तैयप एर्दोगन यांनी अलीकडेच आपल्या पक्षाच्या बैठकीत तुर्कीच्या परमाणू हत्यारांच्या निर्मितीची इच्छा बोलून दाखवली आहे. एर्दोगन यांनी आपल्याच पक्षातील नेत्याला म्हटलं की, काही देशांकडे आण्विक हत्यारं लेस मिसाईल्स आहेत. परंतु त्या आपल्याकडे नाहीत. एर्दोगन यांनी म्हटलं की, हे मला सहन नाही होत.

15 वर्षांपूर्वी पाकिस्तानचा आण्विक तस्कर अब्दुल कादिर खान याने म्हटलं होतं की, त्याने काही देशांना आण्विक तंत्रज्ञान विकलं होतं आणि याची बेकायदेशीर निर्यातही केली होती. आता तुर्कीच्या राष्ट्रपतींच्या वक्तव्यानंतर हा मुद्दा पु्न्हा तापला आहे. पाकिस्तान या सर्व प्रश्नांच्या मध्यभागी आहे कारण ते अणूप्रसारासाठी कुप्रसिद्ध आहे.

अमेरिकन माध्यमांनी उपस्थित केले सवाल
तुर्कीचे राष्ट्रपती रेसेप तैयप एर्दोगन यांच्या वक्तव्यानंतर अमेरिकेतील हालचालींना वेग आला आहे. प्रसिद्ध अमेरिकन वृत्त पत्र न्यूयॉर्क टाईम्सने सोमवारी आपल्या रिपोर्टमध्ये म्हटलं आहे की, जर अमेरिका या तुर्कीश नेत्याला (एर्दोगन) आपल्या सहकाऱ्यांना बर्बाद होण्यापासून रोखू शकत नसेल तर तो त्याला आण्विक हत्यार बनवण्यापासून अथवा इराणप्रमाणे अणु तंत्रज्ञान एकत्र करण्यापासून कसं अडवू शकतो?

न्यूयॉर्क टाईम्सने आपल्या रिपोर्टमध्ये पुढे म्हटलं आहे की, तुर्की आधीपासूनच बॉम्ब बनवण्याच्या कार्यक्रमावर काम करत आहे. त्याने युरेनियमचा साठा गोळा केला आहे आणि अणुभट्ट्यांशी संबंधित संशोधन करीत आहेत. जगातील कुख्यात अणु तस्कर पाकिस्तानी नागरिक अब्दुल कादिर खान याच्याशी तुर्कीचा गुप्त करार आहे.

लंडनच्या संस्थेने केला होता रिसर्च
लंडनच्या थिंक-टँक इंटरनॅशनल इंस्टिट्यूट ऑफ स्ट्रॅटेजिक स्टडीजने पाकिस्तानच्या कुप्रसिद्ध अणु तस्कर अब्दुल कादिर खान याच्या नेटवर्कवर न्यूक्लियर ब्लॅक मार्केट या नावाने अभ्यास केला होता. अभ्यासानुसार तुर्कीच्या कंपन्यांनी अब्दुलला युरोपमधून अणु सामग्री आयात करण्यात मदत केली होती.

पाकिस्तान आला सवालांच्या घेऱ्यात
पाकिस्तानने प्रथमच अणु तंत्रज्ञान विकल्याचा खुलासा 2004-05 मध्ये झाला. त्याचवेळी अणु तस्कर अब्दुल कादिर खान यांने टीव्हीमध्ये कबूल केले होते की त्याने त्याचे तंत्रज्ञान अनेक देशांना विकले आहे. कादिरने असे म्हटले होते की, त्याने ते खासगीरित्या केले, त्यात पाकिस्तानची कोणतीही भूमिका नाही. परंतु या प्रक्रियेत पाकिस्तानची यंत्रणा आणि सुविधा वापरल्या गेल्या हे स्पष्ट झाले होते.

Visit : policenama.com