बहिण कृती सेनननं शेअर करताच व्हायरल झाला नुपूरचा ‘व्हिडीओ’ !

पोलीसनामा ऑनलाईन :सध्या देशात लॉकडाऊन असल्यानं सेलेब्स आपल्या घरातच बंद आहेत. असं असलं तरी ते सोशलवरून चाहत्यांच्या संपर्कात येताना दिसत आहेत. अलीकडेच अभिनेत्री कृती सेनन हिनं इंस्टावर एक व्हिडीओ शेअर केला आहे जो मनाला स्पर्श करणारा आहे.

कृतीनं तिच्या इंस्टावरून एक पोस्ट शेअर केली आहे. यात एक व्हिडीओ आहे हा व्हिडीओ तिची बहिण नुपूर सेनन हिचा आहे. व्हिडीओत दिसत आहे की, नुपूर स्विंग चेअरवर बसली आणि एक कविता सादर करत आहे. खास बात अशी की, ही कविता खुद्द नुपूरनं लिहली आहे. कवितेच नाव आहे तो तुम इसलिए.

व्हिडीओ शेअर करत कृती म्हणते, “आपण आजही या धावपळीच्या जीवनात प्रेमाबद्दल सवाल उपस्थित करत असतो, जिथं खोल संवेदनांची कमी आहे. सादर आहे नुपूर सेनन हिनं लिहिलेली खास कविता. या कवितेनं माझ्या मनाला स्पर्श केल आहे. आशा करते की, तुम्हीही भावूक व्हाल. नुपूर तू एवढी मोठी कधी झालीस?”

कृतीच्या या व्हिडीओवर एकानं कमेंट केली की, “आता नुपूर दी एक चांगली सिंगर असण्यासोबतच एक पोएटही आहे.” आणखी एकानं कमेंट केली की, तू कधी लिहिणार आहेस पुढची पोएम. सध्या हा व्हिडीओ चाहत्यांमध्ये व्हायरल होताना दिसत आहे.

https://www.instagram.com/p/B7fl1dFn28Y/