OBC Caste Census In Maharashtra | भाजप पक्ष म्हणून महायुतीकडे OBC जनगणनेची मागणी करणार, ओबीसी जागर यात्रेत चंद्रशेखर बावनकुळेंची मोठी घोषणा (व्हिडिओ)

Chandrashekhar Bawankule On Baramati Lok Sabha | If Baramati Lok Sabha Seat Goes To NCP Ajit Pawar Group Than We Will Work For Win

नागपूर : पोलीसनामा ऑनलाइन – OBC Caste Census In Maharashtra | बिहारमध्ये जाती आधारित जनगणनेचे आकडे जाहीर करण्यात आले आहेत. बिहारच्या मुख्य सचिवांनी सोमवारी पत्रकार परिषदेत बिहारमधील जाती आधारित जनगणनेची आकडेवारी जारी केली. बिहारनंतर महाराष्ट्रात जातनिहाय जनगणना होणार का असा प्रश्न विचारला जात आहे. सत्तेत असलेले शिवसेना-भाजप-राष्ट्रवादी महायुती सरकार यासंदर्भात काय भूमिका घेणार हे अद्याप स्पष्ट नाही. मात्र, यातील भाजपकडून आपली भूमिका काय असेल हे भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी स्पष्ट केलं आहे. राज्यातील ओबीसींची जनगणना करण्यात यावी अशी मागणी भाजप पक्ष म्हणून महायुती सरकारकडे करणार असल्याची मोठी घोषणा बावनकुळे यांनी केली आहे. भाजपच्या हिंगणघाट येथील ओबीसी जागर यात्रेत त्यांनी ही घोषणा केली. (OBC Caste Census In Maharashtra)

बिहारमध्ये नीतीश कुमार सरकारने जातनिहाय जनगणनेचा अहवाल जारी केला आहे. बिहार प्रमाणे महाराष्ट्रात देखील ओबीसींची जात निहाय गणना करवी अशी मागणी भाजपच्या ओबीसी जागर यात्रेत करण्यात आली. यात्रेत उपस्थित असलेले चंद्रशेखर बावनकुळे यांनी भाजप पक्ष म्हणून महायुती सरकारकडे ओबीसींची जात निहाय गणना करण्याची मागणी करेल असे जाहीर केले. (OBC Caste Census In Maharashtra)

बिहारप्रमाणे राज्यातही ओबीसींच्या विविध जातींचा सर्वे करण्यात यावा अशी मागणी भाजप नेते आशिष देशमुख यांनी केली.
ते म्हणाले, आताच बिहार सरकारने ओबीसींच्या गणनेचे आकडेवारी जाहीर केली आहे.
मी बावनकुळे यांच्याकडे मागणी करतो की आधीच्या महाराष्ट्र विधानसभेने एक मुखाने ओबीसी आणि इतर जातीची गणना करण्याची मागणी केली आहे. बिहारच्या या जातनिहाय गणनेनंतर बावनकुळे यांना विनंती आहे, आपण सत्ताधारी भाजपचे प्रदेशाध्यक्ष आहात, आपण महाराष्ट्रात ओबीसी मधील विविध जातींचा सर्वे करुन आकडे जाहीर करण्याची मागणी सरकारकडे करावी.

आशिष देशमुख यांच्या मागणीवर उत्तर देताना बावनकुळे म्हणाले, बिहारचा जो रिपोर्ट आज आला आहे,
त्यानंतर देशमुख यांनी मागणी केली आहे की महाराष्ट्र सरकारने ओबीसींचा सामाजिक आर्थिक स्टॅटिस्टिक डेटा
जाहीर करावा. ओबीसींची संख्या किती आहे याचा डेटा राज्य सरकारने सर्वे तयार करुन तो जाहीर करावा,
यासंदर्भात आम्ही राज्य सरकारला विनंती करु.

https://x.com/cbawankule/status/1708794359905480831?s=20

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

INDIA Alliance Main Bhi Gandhi Rally In Mumbai | ‘इंडिया’च्या ‘मी पण गांधी’ पदयात्रेला गालबोट, मुंबईत कार्यकर्ते-पोलिसांत वादंग?

Total
0
Shares
Related Posts
Satish Wagh Murder Case

Satish Wagh Murder Case | पुणे : आमदार योगेश टिळेकर यांचे मामा सतीश वाघ यांच्या पूर्वीच्या भाडेकरुने पाच महिन्यापूर्वी दिली होती सुपारी; पोलिसांच्या तपासात धक्कादायक माहिती आली समोर