OBC Reservation | ओबीसींना आकर्षित करण्याचा भाजपाचा प्लान ठरला, १० राज्यांच्या नेत्यांसोबत अमित शाहांची मध्यरात्रीपर्यंत बैठक

नवी दिल्ली : OBC Reservation | काल भाजपा मुख्यालयात बिहार, उत्तर प्रदेश, महाराष्ट्रासह १० राज्यांचे प्रदेशाध्यक्ष आणि प्रमुख नेते यांची बैठक झाली. या बैठकीत आरक्षण मुद्द्यांवर चर्चा करण्यात आली. मध्यरात्रीपर्यंत ही बैठक सुरू होती. भाजपासाठी (BJP) ओबीसी मतदार (OBC Voter) महत्त्वाचा आहे. विशेष म्हणजे २०२४ च्या लोकसभेसाठी (Lok Sabha Election 2024) भाजपा अशी कुठलीही चूक करणार नाही जेणेकरून ओबीसी मतदार पक्षापासून दूर जाईल. यासाठी भाजपाने व्युहरचना करण्यास सुरूवात केली आहे. याची सूत्रे स्वता गृहमंत्री अमित शाह (Home Minister Amit Shah) आणि राष्ट्रीय अध्यक्ष जेपी नड्डा (BJP National President JP Nadda) यांनी हातात घेतली आहेत. (OBC Reservation)

भाजपाचे मित्रपक्ष आणि विरोधी पक्ष असलेल्या काँग्रेसने (Congress) जातीनिहाय जनगणनेचा मुद्दा उचलून धरल्याने भाजपाने ओबीसी मतांसाठी ही धावपळ सुरू केली आहे.

या बैठकीला उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis), बीएल संतोष (BL Santosh), बिहार भाजपा प्रमुख सम्राट चौधरी (Bihar BJP chief Samrat Chaudhary), ओबीसी मोर्चाचे प्रमुख के. लक्ष्मण आदींसह १० राज्यांचे प्रदेशाध्यक्ष आणि प्रमुख नेते उपस्थित होते.

बैठकीत केंद्रीय नेतृत्वाने ओबीसी समाजापर्यंत पोहचणे आणि जास्तीत जास्त ओबीसी समाजाला पक्षाच्या बाजूने वळवणे
यावर जोर दिला. पक्षाने उत्तर प्रदेश, बिहार, महाराष्ट्र आणि कर्नाटकातील ओबीसी समाजाला एकत्र ठेवण्याची रणनीती आखण्यात आली. या समाजाच्या मतांनी राज्याच्या निवडणुकीवर परिणाम होऊ शकतो. केंद्र सरकारकडून (Central Govt) ओबीसी समाजासाठी असणाऱ्या योजना, त्यांचा लाभ संबंधित घटकांपर्यंत पोहचवण्यासाठी आढावा घ्या, असे या बैठकीत सांगण्यात आले. (OBC Reservation)

यासाठी भाजपने एक समिती स्थापन केली आहे. भाजप सरकारने मागासवर्गीयांच्या हिताचे जास्तीत जास्त काम
आणि निर्णय घेतल्याचे भाजप नेत्यांनी ओबीसी समाजाला जाऊन सांगावे, असे बैठकीत ठरवण्यात आले.
तसेच निवडणुकीचा प्रचार ओबीसी केंद्रीत करावे, असे ठरवण्यात आले.

बिहारनंतर आता विविध राज्यात भाजपाचे मित्रपक्ष जातनिहाय जनगणना करण्याची मागणी करत आहेत.
त्यानंतर सत्ताधारी भाजपाने रणनीती आखण्यास सुरुवात केली आहे. ओबीसी मते आकर्षिक करण्याचा विरोधी पक्षाचा
डाव उधळण्यासाठी भाजपा सतर्क झाली असून त्यासाठीच वरिष्ठ पातळीवर बैठकांचे सत्र सुरू झाले आहे.

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Atul Bedekar Passed Away | व्ही पी. बेडेकर अँड सन्सचे संचालक अतुल बेडेकर यांचे निधन

Pune Crime News | पुणे विद्यापिठातील वसतिगृहाच्या भिंतीवर मोदींबाबत आक्षेपार्ह मजकूर, विद्यापीठाकडून पोलिसांकडे तक्रार

Pune Crime News | एक कोटीचे दागिने घेऊन सोन्याच्या दुकानातील कर्मचारी पसार, पुण्यातील घटना

Crime News | खोट्या सह्या करुन बँक खात्यातून पैसे काढून महिलेची फसवणूक, कोथरुड मधील प्रकार

Indrani Balan Foundation | ‘इंद्राणी बालन फाऊंडेशन’ काश्मीरमधील आणखी शाळा दत्तक घेणार – पुनीत बालन