OBC Reservation | ‘पवार कुटुंब राज्यातील ओबीसींचा कर्दनकाळ’, भाजप आमदाराचा घणाघाती आरोप

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – सर्वोच्च न्यायालयाने (Supreme Court) ओबीसींच्या राजकीय आरक्षणाला (OBC Reservation) स्थगिती दिली आहे. या निर्णयामुळे राज्यात आरोप प्रत्यारोपांचं घमासान सुरु झालं आहे. भाजपचे आमदार गोपीचंद पडळकर (BJP MLA Gopichand Padalkar) यांनी ओबीसी आरक्षणावरुन (OBC Reservation) राज्य सरकारवर (Maharashtra Government) आरोप केले आहेत. ओबीसींचे आरक्षण संपवण्याचा घाट या सरकारचा असल्याचा आरोप त्यांनी केला आहे. त्यामुळे ओबीसी समाज सरकारवर नाराज असल्याचे देखील पडळकर यांनी सांगितले.

 

पवार कुटुंब आरक्षण विरोधी

भाजप आमदार गोपीचंद पडळकर यांनी म्हटले की, राज्य सरकारने आधी पदोन्नतीचे आरक्षण रद्द करुन आपण एससी (SC), एसटी (ST), ओबीसी (OBC), भटक्या विमुक्त जाती विरोधात आहोत हे दाखवून दिले आहे. ओबीसी आरक्षण (OBC Reservation) विरोधात शरद पवार यांचे कुटुंबीय (Sharad Pawar family) असल्याचा आरोप पडळकर यांनी केला आहे. उद्या शैक्षणिक आरक्षण (Educational reservation) ही संपवतील असा घाणाघाती आरोप पडळकर यांनी केला आहे.

 

मग राज्य कशाला चालवता

गोपीचंद पडळकर यांनी राष्ट्रवादीच्या (NCP) खासदार सुप्रिया सुळे (MP Supriya Sule) यांच्यावरही टीका केली.
सुप्रीम कोर्टाने इम्परिकल डाटा (Imperial data) जमा करा असे
केंद्र सरकारला (Central Government) सांगितले नाही.
प्रत्येक गोष्ट केंद्राने करावी असं वाटत असेल तर मग राज्य कशाला चालवत आहात,
असा सवाल त्यांनी केला. तुम्हाला काम करता येत नसेल आणि रोज उठून केंद्राकडे बोट दाखवत असाल
तर राज्य केंद्राकडे देऊन टाका असेही पडळकर यांनी म्हटले.

 

पवार कुटुंब ओबीसींचा कर्दनकाळ

राज्यातील ओबीसींचा कर्दनकाळ पवार कुटुंब आहे असा गंभीर आरोप करत या समितीचे अध्यक्ष अजित पवार (Ajit Pawar) कसे काय असू शकतात? असा गंभीर सवाल पडळकर यांनी उपस्थित केला. पदोन्नतीच्या बाबतीत जे केलं ते आता पवार कुटुंब ओबीसी समाजाच्या बाबतीत करत आहेत, असा आरोप त्यांनी केला. तसेच ओबीसींचा नेमका शत्रू कोण हे आता ओळखलं पाहिजे असे सांगत भाजप ओबीसी आरक्षणाचा प्रश्न यापुढेही मांडत राहिल आणि यासंदर्भात आंदोलन करत राहू असे पडळकर यांनी सांगितले.

 

Web Title :- OBC Reservation | obc reservation row bjp mla gopichand padalkar criticized on sharad pawar family over stay on obc reservation

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा