ऑनलाइन मुलाखत द्या अन् मिळवा सरकारी नोकरी, ‘ऑयल इंडिया’मध्ये नोकर भरती

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – कोरोना संकटाचा सामना करत असताना अनेकांना आपले रोजगार गमवावे लागेल आहेत. अनेक मोठ-मोठ्या कंपन्यांनी कर्मचारी कपात केल्याने अनेकांच्या नोकरीवर गदा आली. मागील वर्षभरात लॉकडाऊनमुळे कंपन्यांना मोठं आर्थिक नुकसान सहन करावे लागल्याने याचा थेट परिणाम सर्वसामान्य कर्मचाऱ्यांवर झाला आहे. आता जनजीवन हळूहळू पुर्वपदावर येण्यास सुरुवात झाली आहे. अनेक ठिकाणी पुन्हा रोजगाराच्या संधी उपलब्ध होऊ लागल्या आहेत.

भारत सरकारच्या नवरत्न कंपनी ऑयल इंडियाने (Oil India) अभियंता, केमिस्टसह वेगवेगळ्या रिक्त पदांवर भरती काढली आहे. इच्छुक उमेदवार 19 जानेवारी 2021 पर्यंत या पदांसाठी ऑनलाइन अर्ज करु शकतात. पदांसाठी अर्ज करण्याबाबत संपूर्ण माहितीसाठी उमेदवारांनी जाहिरात पहावी. तसेच खाली दिलेल्या लिंकवर क्लिक करुन माहिती पहावी.

पदांचा तपशील आणि वेतन
1. ड्रिलिंग अभियंता – 2 पदे, वेतन 50,000 हजार रुपये
2. आयटी अभियंता – 1 पदं, वेतन 45,000 हजार रुपये
3. केमिस्ट – 1 पदं – वेतन 50,000 हजार रुपये
अर्ज करण्याची अंतिम मुदत – 19 जानेवारी 2021

वय मर्यादा – या पदासाठी उमेदवाराची कमाल मर्यादा 65 वर्षे निश्चित केली आहे.

निवड प्रक्रिया – उमेदवारांची निवड ऑनलाइन मुलाखतीच्या आधारे करण्यात येणार आहे.

शैक्षणिक पात्रता – उमेदवारास किमान शिक्षण म्हणून इंजिनिअर क्षेत्रात पदवी असणे आवश्यक आहे. तपशीलवार माहितीसाठी अधिसूचना वाचावी.

अर्जाची प्रक्रिया – अर्ज डाऊनलोड करुन भरा आणि शेवटच्या तारखेपूर्वी दिलेल्या ई-मेल आयडीवर पाठवा.

ई-मेल आयडी – [email protected]

अधिकृत संकेतस्थळ – https://www.oil-india.com/

अधिसूचना आणि अर्ज भरण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा
https://www.oil-india.com/Document/Career/Advertisement%20for%20engagement%20on%20contract%20for%20Rajasthan%20Field.pdf