वृद्ध ग्राहकास वेटरने केली मारहाण

पिंपरी : पोलिसनामा ऑनलाइन – ऑर्डर दिलेला नाष्टा देण्यास उशीर झाल्याने विचारणा केली म्हणून वृद्ध ग्राहकास वेटरने मारहाण केल्याची घटना ट्रान्सपोर्टनगर, निगडी येथे घडली.

या प्रकरणी अशोक गोपाळराव पवार (60, रा. यमुनानगर, निगडी) यांनी फिर्याद दिली आहे. तर आफ्रिदी शेख ऊर्फ अस्मान (रा. स्वागत हॉटेल, ट्रान्स्पोर्टनगर, निगडी) याच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे.पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पवार शनिवारी सकाळी ट्रान्सपोर्टनगर येथील स्वागत हॉटेलमध्ये नाष्टा करण्यासाठी गेले.

त्यांनी नाष्ट्याची ऑर्डर दिली. ऑर्डर देऊन बराच वेळ झाला तरी ऑर्डर आली नाही. त्यामुळे पवार यांनी वेटरला याबाबत विचारले. त्यावरून वेटरने त्यांच्याकडे रागाने बघितले. याची विचारणा केली असता वेटरने पवार यांना शिवीगाळ करत त्यांना मारहाण केली. तपास निगडी पोलीस करीत आहेत.