Omicron Covid Variant | ओमायक्रॉन बाधितांची संख्या वाढणार पण स्थिती गंभीर नसणार; आयआयटी कानपूरच्या प्राचार्यांचा दावा

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – कोरोनाच्या ओमायक्रॉन विषाणूचा संसर्ग (Omicron Covid Variant) देशात दिसू लागला आहे. अनेक बाधित देशात आढळून येत आहे. त्यामुळे आरोग्य यंत्रणा खडबडून जागी झाली आहे. त्यातच आता आयआयटी कानपूरच्या संगणक विज्ञान आणि अभियांत्रिकी विभागाचे प्राचार्य आणि उपसंचालक मनिंदर अग्रवाल (Principal and Deputy Director Maninder Agarwal) यांनी एक दावा केला आहे. त्यांनी केलेल्या संशोधनानुसार जानेवारी २०२२ चा शेवटचा आठवडा आणि फेब्रिवरीच्या सुरुवातीच्या दिवसात देशामध्ये ओमायक्रॉन (Omicron Covid Variant) बाधितांची संख्या सर्वाधिक दिसेल. पण, डेल्टा व्हेरिएंटमुळे आलेल्या दुसऱ्या लाटेइतका ओमायक्रॉन लाटेचा परिणाम नसेल असे त्यांनी म्हंटले. दरम्यान प्रा. अग्रवाल यांनी संशोधन करून दुसऱ्या लाटेत अनेक भाकीत केली. ती भाकिते बऱ्याच अंशी खरी ठरली. त्यामुळे त्यांनी ओमायक्रॉनबाबत नोंदवलेले भाकीत महत्त्वाचे आहे.

 

प्रा. अग्रलवाल यांनी सांगितल्यानुसार, वेगाने संसर्ग होण्याची लक्षणे ओमायक्रॉनमध्ये दिसतात. परंतु, बाधितनामध्ये दिसणारी लक्षणे गंभीर नाहीत. नागरिकांमध्ये निर्माण झालेल्या हर्ड इम्युनिटीला ओमायक्रॉन (Omicron Covid Variant) चकवा देईल, अशी शक्यता दिसत नाही. भारतात ओमायक्रॉनची स्थिती गंभीर होण्याची शक्यता कमी आहे. कारण देशातील ८० टक्के नागरिकांमध्ये हर्ड इम्युनिटी विकसित झालेली असल्याचे प्रा अग्रलवाल यांनी म्हंटले आहे.

 

माेठ्या शहरांमध्ये पसरणार ओमायक्राॅन

दक्षिण आफ्रिकेत आढळलेला ओमयक्राॅन व्हेरिएंट आतापर्यंत जगभरातील ३० देशांमध्ये पसरला आहे.
त्यामुळे संपूर्ण जगामध्ये ओमयक्राॅन किती धोकादायक ठरू शकतो यावर विचारमंथन सुरु झाले आहे. देशातील काही तज्ज्ञांनी दिलासादायक माहिती दिली आहे.
देशातील मोठ्या शहरांमध्ये ओमायक्राॅन पसरेल पण त्याची लक्षणे सौम्य राहतील असे वैज्ञानिक आणि औद्याेगिक संशाेधन परिषदेचे माजी प्रमुख डाॅ. राकेश मिश्रा यांनी सांगितले.
डॉ मिश्रा म्हणाले की, हायब्रीड इम्युनिटी हि ओमायक्राॅनविराेधात अतिशय प्रभावी ठरू शकते. दुसऱ्या लाटेमध्ये अनेकांना कोरोनाचा संसर्ग झाला होता.
त्यानंतर लसीकरणही मोठ्या प्रमाणात झाले होते. त्यामुळे लोकांमध्ये रोगप्रतिकारशक्ती वाढली आहे.
नवे व्हेरिएंट येतच राहणार असून ते राेखण्यासाठी काेणताही ठाेस उपाय नाही. (Omicron Covid Variant)

 

Web Title :- Omicron Covid Variant | condition may not be severe even if patient has omicron covid variant comfortable information indians

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा