Devendra Fadnavis | ‘काही संकुचित वृत्ती देशाला ‘त्या’ मार्गावरून खाली उतरविण्याचा प्रयत्न करतात’ (व्हिडिओ)

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – Devendra Fadnavis | पुण्यातील सिंबायोसिस संस्थेच्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर संग्रहालय आणि स्मारकास केंद्रीय सूक्ष्म, लघु आणि मध्यम उद्योग मंत्री नारायण राणे (Narayan Rane) आणि विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी आज (सोमवारी) भेट देऊन अभिवादन केले. त्यानंतर फडणवीस यांनी पत्रकारांशी संवाद साधला. ‘आज देश त्याच मार्गाने चालला आहे. पण देशाला काही संकुचित वृत्ती त्या मार्गावरून खाली उतरविण्याचा प्रयत्न करतात. त्या सर्व संकुचित वृत्तीना मी आवाहन करतो.’ असं म्हणत फडणवीस यांनी काँग्रेसला (Congress) टोला लगावला आहे.

देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) म्हणाले, ‘संसदेत बाबासाहेब आंबेडकर यांनी त्यावेळी भाषण केले. ते आज आपण ऑडिओच्या माध्यमांतून ऐकले. तशाच प्रकाराच भाषण आज संसदेत करण्याची परिस्थिती पाहण्यास मिळत आहे. बाबासाहेबांनी त्यावेळी काय सांगितले तर संकुचित वृत्ती सोडून, आपण सर्वजण एका मार्गाने चालण्याचा विचार केला. तर आपण या देशाला महान बनवू शकतो. आज देश त्याच मार्गाने चालला आहे. पण देशाला काही संकुचित वृत्ती त्या मार्गावरून खाली उतरविण्याचा प्रयत्न करतात. त्या सर्व संकुचित वृत्तीना मी आवाहन करतो.’ अस फडणवीस म्हणाले.

 

‘भारतरत्न बाबासाहेब आंबेडकर यांनी जो मार्ग दाखविला आहे. त्या मार्गाने आपण चाललो तर येत्या 10 वर्षात भारत देशाला विकसित म्हणून प्रस्थापित करू शकतो. त्यामुळे मी एक सांगू इच्छितो की देशातील कोणत्याही समस्येच उत्तर बाबासाहेब आंबेडकर यांनी दिलेल्या संविधानामध्ये आहे. हे संविधान तयार करताना स्वातंत्र्य, बंधुता आणि समता हे विचार त्यातून मांडले आहे,’ असं यावेळी फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी म्हटलं आहे.

‘लंडनमधील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे घर, राज्य सरकारने वतीने विकत घेतले.
केंद्र सरकारकडून मुंबईतील इंदु मीलसाठी मोफत जागा दिली. त्यावेळेस राज्य सरकारने 100 कोटी रुपये दिले.
आता लवकरच बाबासाहेबांचे स्मारक पुर्ण होईल,’ असं फडणवीस म्हणाले.

 

Web Title :- Devendra Fadnavis | bjp leader devendra fadanvis talks in pune about babasaheb ambedkar on mahaparinirvan din

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

DGP Sanjay Pandey | पोलीस महासंचालक संजय पांडेंनी आरोप फेटाळले, म्हणाले – ‘परमबीर सिंह यांनी प्रकरण संपवण्यासाठी…’

7th Pay Commission | सरकारी कर्मचार्‍यांसाठी मोठी खुशखबर ! नववर्षापूर्वी ‘या’ कर्मचार्‍यांच्या पगारात होऊ शकते 95,000 रुपयांपर्यंत वाढ, समजून घ्या ‘कॅलक्युलेशन’

Omicron Covid Variant | दोन्ही डोस घेतल्यानंतरही ‘कोरोना’ची लागण झालीय तर बूस्टर डोसबद्दल केंद्र सरकारने निर्णय घ्यावा – अजित पवार