Omicron Covid Variant in Pune | नायजेरियातून पिंपरीत आलेल्या आणखी 4 जणांना ‘ओमायक्रॉन’ची बाधा

पिंपरी : पोलीसनामा ऑनलाइन – Omicron Covid Variant in Pune | मागील काही दिवसांत पिंपरी चिंचवड परिसरात एकूण 6 ओमायक्रॉन बाधित आढळुन (Omicron Covid Variant in Pune) आले होते. त्यातील 4 रुग्ण बरे झाले असल्याची माहिती सकाळीच उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांनी दिली. दरम्यान, पिंपरीत (Pimpri) आणखी नवे चार ओमायक्रॉन व्हेरिंएट बाधित (4 omicron variants) सापडले असल्याची माहिती समोर आली आहे. 4 जणांना ओमायक्रॉनची लागण झाल्याची माहिती महापालिकेच्या आरोग्य विभागाकडून (Municipal Health Department) देण्यात आली आहे.

नायजेरीयातून लेगॉस शहरातून आपल्या भारतीय वंशाची 44 वर्षीय महिला आपल्या भावाला भेटण्यासाठी आली होती. तिच्या सोबत तीच्या 2 मुली आल्या होत्या. त्यातील या तिघींच्या संपर्कात आलेल्या 13 जणांची तपासणी केली होती. त्यात महिलेचा 45 वर्षीय भाऊ, त्यांची दीड वर्षे, 7 वर्षांची दोन मुली अशा 6 जणांना ओमायक्रॉनची बाधा (Omicron Covid Variant in Pune) झाल्याचा अहवाल मिळाला होता. त्यांच्या संपर्कातील आणखी 4 जणांना ओमायक्रॉनची लागण झाल्याची माहिती मिळत आहे. दरम्यान, त्यांची प्रकृती स्थिर असून त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

दरम्यान, नायजेरीयातून आलेल्या 3 आणि त्यांच्या संपर्कातील 3 अशा एकूण 6 जणांच्या घशातील द्रवाचे नमुने जिनोम सिकव्हेंसिंगसाठी (Genome sequencing) पुण्यातील एनआयव्ही येथे पाठविले होते.
तत्पूर्वी पॉझिटिव्ह आलेल्या 6 जणांना पिंपरी येथील नवीन जिजामाता रुग्णालयात गृहविलगीकरणात ठेवले होते.
त्यापैकी 4 जण बरे होऊन घरी सोडण्यात आले आहे. तसेच, दोघांचे अहवाल प्रतीक्षेत आहेत.
मात्र, आता त्यांच्या संपर्कातील आणखी 4 जणांचे अहवाल पॉझिटिव्ह (Positive) आले असल्याचे समोर आले आहे.

 

Web Title :- Omicron Covid Variant in Pune | four other members nigerian family pimpri chinchwad were infected omicron covid variant

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

 

Pune Crime | पुणे ग्रामीण पोलिसांकडून इलेक्ट्रॉनिक्स दुकानात दरोडा टाकणारी 6 जणांची टोळी गजाआड

Mumbai Crime | ACP दिपक फटांगरे आणि IPS देवेन भारती यांच्यावर FIR; जाणून घ्या प्रकरण

Pune Corona | पुणे शहरात गेल्या 24 तासात कोरोनाचे 77 नवीन रुग्ण, जाणून घ्या इतर आकडेवारी