Homeताज्या बातम्याOmicron Covid Variant | भारतात ओमिक्रॉनच्या अगोदर रूग्णांमध्ये दिसून आली 'ही' लक्षणे,...

Omicron Covid Variant | भारतात ओमिक्रॉनच्या अगोदर रूग्णांमध्ये दिसून आली ‘ही’ लक्षणे, तुम्ही सुद्धा व्हा सावध

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – कोरोना व्हायरसचा नवीन ओमिक्रॉन व्हेरिएंट (Omicron Covid Variant) संपूर्ण जगात हळुहळु आपले पाय पसरवू लागला आहे. अनेक देशांमध्ये प्रतिबंधाचे सत्र पुन्हा एकदा सुरू झाले आहे. भारतात सुद्धा याची दोन प्रकरणे समोर आल्याने खळबळ उडाली आहे. ही दोन्ही प्रकरणे कर्नाटक (Omicron in Karnataka) मध्ये आढळली आहेत. मात्र, आरोग्य मंत्रालयाने लोकांना न घाबरण्याचे आवाहन करत सुरक्षेची पूर्ण काळजी घेण्याचा सल्ला दिला आहे. (Omicron Covid Variant)

 

भारतात कशी पोहचली ओमिक्रॉनची दोन प्रकरणे –
कर्नाटकचे आरोग्य मंत्री के. सुधाकर यांच्या नुसार ही दोन्ही प्रकरणे डेल्टा व्हेरिएंटसोबत मॅच होत नव्हती. केंद्राला यानुसार सतर्क करण्यात आले होते. यापैकी एक 66 वर्षाचा पुरुष आहे जो दक्षिण अफ्रीकन नागरिक आहे. तो 20 नोव्हेंबरला बेंगळुरुला आला होता. जिथे त्याची कोरोना टेस्ट पॉझिटिव्ह आली. (Omicron Covid Variant)

 

एका रुग्णाची टॅव्हल हिस्ट्री नाही
त्यास एका हॉटेलमध्ये आयसोलेट करण्यात आले. 23 नोव्हेंबरला त्याची पुन्हा टेस्ट करण्यात आली जी निगेटिव्ह आली. यानंतर 27 नोव्हेंबरला तो दुबईला गेला. त्याच्या संपर्कात आलेल्या सर्व लोकांची टेस्ट निगेटिव्ह आली आहे. तर ओमिक्रॉनचे दुसरे प्रकरण 46 वर्षाच्या डॉक्टरचे आहे जो एका सरकारी हॉस्पिटलमध्ये काम करतो. त्याची कोणतीही ट्रॅव्हल हिस्ट्री सुद्धा नव्हती.

ओमिक्रॉन व्हेरिएंटची लक्षणे (Symptoms of Omicron Variant)-
46 वर्षीय डॉक्टरने खुप जास्त थकवा, कमजोरी आणि तापासारखी लक्षणे दिसल्यावर टेस्ट केली असता तो पॉझिटिव्ह आढळला. रिपोर्टनुसार, त्याची सायकल थ्रेशहोल्ड व्हॅल्यू (CT value) कमी होती ज्यानंतर त्याचे सॅम्पल पाठवण्यात आले. त्याच्या संपर्कात आलेल्या 5 लोकांची सुद्धा टेस्ट पॉझिटिव्ह आली आहे.

 

ओमिक्रॉनची लक्षणे खुप गंभीर नाहीत
दक्षिण अफ्रीकेच्या शास्त्रज्ञांचे म्हणणे आहे की, या व्हेरिएंटची लक्षणे खुप गंभीर नाहीत. मात्र, हलकी लक्षणे असल्याने बहुतांश लोकांना तो समजत नाही आणि संसर्ग सहज पसरण्याची शक्यता असते. यासाठी जर कोणतीही लक्षणे आढळली तर टेस्ट करा.

 

सर्व 6 प्रकरणांची ओळख पटली
कर्नाटकच्या आरोग्य मंत्र्यांनी सांगितले की, सध्या हे सांगता येत नाही की, ओमिक्रॉन कसा पसरतो. मात्र, चिंतेची कोणतीही बाब नाही कारण सर्व 6 प्रकरणांची ओळख पटली आहे आणि त्यांच्या कोणतीही मोठी समस्या आढळून आलेली नाही. जसे की आम्ही डेल्टा व्हेरिएंटमध्ये श्वास घेण्यासारखी गंभीर समस्या पाहिली होती, ओमिक्रॉनमध्ये सध्यातरी असे लक्षण आढळून आलेले नाही. याची लक्षणे खुप हलकी आहेत. (Omicron Covid Variant)

 

कर्नाटकच्या अधिकार्‍यांनुसार, राज्यात ओमिक्रॉनची प्रकरणे आणखी जास्त असू शकतात कारण जो दुसरा व्यक्ती पॉझिटिव्ह आढळला आहे,
त्याची कोणतीही ट्रॅव्हल हिस्ट्री नव्हती.

 

सॅम्पल जीनोम सिक्वेन्सिंगसाठी पाठवले
सर्व प्रकरणांमध्ये कोणतीही विशेष लक्षणे दिसून आली नाहीत.
एक्सपर्टनुसार या सर्व प्रकरणांमध्ये CT value कमी आढळून आली आहे.
हेच कारण आहे की, सर्व आंतरराष्ट्रीय प्रवाशांचा पॉझिटिव्ह रिझल्ट जीनोम सिक्वेन्सिंगसाठी पाठवले आहे.

 

Web Title :- Omicron Covid Variant | omicron cases in india coronavirus new variant news symptoms restrictions states Omicron Covid Variant Marathi News

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

Pimpri Corona | पिंपरी चिंचवडमध्ये ‘कोरोना’च्या 44 रुग्णांना डिस्चार्ज, जाणून घ्या इतर आकडेवारी

Pune Crime | पुण्यात नात्याला काळिमा फासणारी घटना ! YouTube वरील व्हिडिओ पाहून 3 वर्षीय चिमुकलीवर भावाकडूनच लैंगिक अत्याचार

Pune Corona | पुणे शहरात गेल्या 24 तासात ‘कोरोना’च्या 84 रुग्णांचे निदान, जाणून घ्या इतर आकडेवारी

Stay Connected
534,500FansLike
125,687FollowersFollow
61,453SubscribersSubscribe
Must Read
Related News