किती हा कॉन्फीडन्स ! थेट बॉण्ड पेपर वर लिहून दिलंय की, ‘तो’ उमेदवार पडणार म्हणून !

करारनामा सोशल मिडीयावर व्हायरल

उस्मानाबाद : पोलीसनामा ऑनलाईन – सध्या लोकसभा निवडणूकीच्या धामधूमीत राजकिय पक्षांकडून आमचाच उमेदवार निवडून येणार असा ठाम दावा करताना दिसतात. परंतु त्याच ठामपणे मतदारही उमेदवाराच्या निवडणून येण्याबाबत बोलताना दिसत आहेत. यावरून पैजा लावल्या जाता.

मात्र उस्मानाबादेत २ मतदारांनी चक्क पैज लावून त्याचा करारनामाही केला आहे. ओमराजे निंबाळकर पडणार असे बॉण्डपेपरवर लिहून दिल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. हा करानामा सध्या सोशल मिडीयावर व्हायरल झाला असून निवडणूकीत मतदारही चुरशीने सहभागी झाले असल्याचे चित्र पाहायला मिळते आहे.

सतराव्या लोकसभा निवडणूकीचे दोन टप्पे पार पडले आहेत. या टप्प्यांमधील मतदारसंघांमध्ये मतदान नुकतेच पार पडले. या वेळी अनेक दिग्गजांसह अनेकांचे भवितव्य मतपेटीत बंद झाले आहे. त्यात उमेदवार आणि त्यांच्या पक्षांना आपल्यालाच जनतेने कौल दिला असल्याचे ठामपणे सांगतात. दरम्यान त्याच ठामपणाने मतदारही आपल्या पसंतीचा नेताच निवडणूकीत बाजी मारणार असं बोलत असतात.

याच्या गप्पा गोष्टी चारचौघांत होत असताना पैजाही लागतात. परंतु उस्मानाबाद मध्ये चक्क ओमराजे निंबाळकर पडणार असं एकाने बॉण्ड पेपरवरच लिहून दिले आहे. आणि ते जिंकून आले तर आपली दुचाकी २४ मे रोजी विना मोबदला बक्षिस म्हणून समोरच्या व्यक्तीला देणार आहे. असं बॉण्ड पेपरवर नोटरी करून लिहून दिले आहे. सध्या हा करारनामा सोशल मिडीयावर व्हायरल झाला आहे.