‘ऑन-ड्युटी’ पोलीस कर्मचाऱ्याचा भरदिवसा खून

उदयपूर (राजस्थान) : वृत्तसंस्था – ऑन ड्युटी पोलीस कॉन्स्टेबलचा भरदिवसा खून केल्याची खळबळजनक घटना राजस्थानमधील राजसमंदमध्ये घडली आहे. पोलीस कॉन्स्टेबल अब्दुल गनी (वय-४५) यांना अज्ञात व्यक्तींनी बेदम मारहाण केली. यामध्ये गंभीर जखमी होऊन त्यांचा मृत्यू झाला. नागरिकांची सुरक्षा करणारेच सुरक्षित नसतील तर इतरांचे काय असा प्रश्न या घटनेवरून उपस्थित होत आहे.

अब्दुल गनी हे भीम पोलीस ठाण्यात कार्यरत होते. एका गुन्ह्याची चौकशी करण्यासाठी शनिवारी संध्याकाळी पाचच्या सुमारास घटनास्थळी गेले होते. या ठिकाणी गनी यांच्यावर अज्ञात टोळक्याने हल्ला केला. गनी यांना लोखंडी सळई, काठीने बेदम मारहाण केली. यामध्ये वर्मी घाव बसल्याने ते गंभीर जखमी झाले. दरम्यान, या घटनेची माहिती पोलिसांना गावकऱ्यांनी दिली. घटनेची माहिती मिळताच वरिष्ठ अधिकाऱ्यांसह पोलिसांचा फौजफाटा घटनास्थळी दाखल झाला. पोलिसांनी गनी यांना सरकारी रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले. मात्र, उपचार सुरु असताना त्यांचा मृत्यू झाला.

गनी यांच्या खुनामुळे पोलीस दलात खळबळ उडाली आहे. त्यांच्यावर कोणी हल्ला केला हे अद्याप समजू शकले नाही. हल्लेखोरांना पकडण्यासाठी पोलिसांची पथके रवाना करण्यात आली आहेत. गनी हे मुळचे जहाजपूरचे रहिवाशी असून त्यांचे कुटुंबीय जहाजपूर येथे वास्तव्यास आहे. या घटनेची माहिती पोलिसांनी त्यांच्या कुटुंबीयांना देण्यात आली आहे.

वजन कमी करण्याचे ‘हे’ १५ रामबाण उपाय, घाम देखील येणार नाही

स्तनाच्या कर्करोगाची ‘ही’ ६ लक्षणं, जाणवल्यास ‘हे’ ४ उपाय तात्काळ करा, जाणून घ्या

गुलाबाच्या फुलाचे अशाप्रकारे सेवन ‘या’ आजारांसाठी उपयुक्‍त, जाणून घ्या

‘हे’ उपाय केल्यास ‘गॅस्ट्रिक ट्रबल’मध्ये त्वरित मिळेल आराम, औषध घेण्याची गरज नाही

दात मजबुत आणि पांढरे शुभ्र राहण्यासाठी ‘या’ ८ पदार्थांचं सेवन नक्‍की टाळा

पांढरे केस पुन्हा काळे करायचे आहेत मग ‘या’ १३ पैकी कोणताही एक उपाय कराच

विज्ञान आणि आयुर्वेद सांगतं ‘या’ पदार्थाने करा जेवणाची सुरूवात, ‘हे’ फायदे होतात