धक्कादायक ! चारित्र्याच्या संशयावरून मुलाकडून डोक्यात कुऱ्हाडीने वार करून आईचा खून

जळगाव : पोलीसनामा ऑनलाईन – चारित्र्याच्या संशयावरून मुलानेच जन्मदात्या आईच्या डोक्यात कुऱ्हाडीने वार करून तिचा खून केल्याचा धक्कादायक प्रकार चाळीसगाव शहरातील दुध डेअरी भागातील नालंदा हायस्कूलजवळील सोमवारी रात्री उघडकिस आला आहे. याप्रकरणी पोलिसांनी मुलाला अटक केली आहे.

समाधान उर्फ आबा शेवाळे (वय २५) असे अटक केलेल्या मुलाचे नाव आहे. तर पमाबाई शेवाळे असे खून झालेल्या महिलेचे नाव आहे.

शिंगटे मळा येथे पंडित हिलाल शिंगटे यांच्या घरात पमाबाई वाल्मीक शेवाळे आणि त्यांचे पती वाल्मिक शेवाळए हे मागील तीन महिन्यांपासून मुलासह राहतात. ९ जून रोजी वाल्मिक शेवाळे हे त्यांच्या मुलीच्या मुलांना सोडण्यासाठी येवला येथे गेले होते. त्यावेळी पमाबाई आणि मुलगा समाधान हे दोघेच घरात होते.

अशा आला प्रकार उघडकिस
पमाबाई व मुलगा समाधान हे दोघेच घरी होते. दरम्यान मंगळवारी घरमालकिण कडिपत्ता तोडण्यासाठी गेल्या. त्यावेळी त्यांना घराचा दरवाजा उघडा दिसला. त्यानंतर त्यांनी आवाज दिला. तेव्हा कोणीही प्रतिसाद न दिल्याने त्या आत गेल्या तेव्हा पमाबाई रक्ताच्या थारोळ्यात पडलेल्या होत्या.

डोक्यात कुऱ्हाडीने वार करून खून
त्यानंतर त्यांनी पती आणि मुलाला माहिती दिली व पोलिसांना माहिती दिली. त्यानंतर घटनास्थळी वरिष्ठ अधिकाऱ्यांसह धाव घेतली. पोलिसांनी पाहणी केली तेव्हा अज्ञाताने अज्ञाताविरोधात गुन्हा दाखल केला. त्यानंतर पोलिसांना समाधान शेवाळे याचा संशय आला. त्याच्याकडे चौकशी केल्यावर त्याने आपल्याला काहीच माहित नसल्याचा आव आणला. मात्र पोलिसांनी सखोल तपास केल्यार त्याने आईचा खून केल्याची कबूली दिली. मला आईच्या चारित्र्यावर संशय होता. त्यामुळे मी आईचा खून केल्याचे कबूल केले.

Loading...
You might also like