COVID-19 : काय सांगता ! होय, ‘कॅन्सर’ हॉस्पीटलमधील ‘डॉक्टर’ झाला ‘कोरोना’ग्रस्त, कुटुंबियांसह रूग्ण आणि स्टाफचा ‘शोध’ सुरू

नवी दिल्ली :  वृत्तसंस्था –   देशाची राजधानी दिल्लीमध्ये डॉक्टरच कोरोनाव्हायरसच्या संसर्गाच्या विळख्यात आले असल्याचे वृत्त आहे. हे नवीन प्रकरण दिलशाद गार्डन मध्ये स्थित दिल्ली राज्य कर्करोग रुग्णालयाचे आहे. या हॉस्पिटलचे कॅन्सरतज्ञ डॉक्टर COVID-19 पॉझिटिव्ह आढळले आहेत. यापूर्वी मोहल्ला क्लिनिकच्या दोन डॉक्टरांना कोरोनाची लागण झाल्याचे समोर आले होते. आता हे प्रकरण आहे ज्यात एका डॉक्टरना कोरोनाची लागण झाली आहे. लागण झाल्याची बातमी समजताच संपूर्ण हॉस्पिटलला सील करून सॅनिटाईझ करण्यात आले आहे.

कॅन्सर हॉस्पिटलच्या कोरोना व्हायरस पॉझिटिव्ह डॉक्टरांचे नातेवाईक तसेच रुग्णालयाचे रूग्ण व कर्मचारी यांचा शोध घेण्यात येत आहे. हे प्रकरण कँन्सर रूग्णालयाचे असल्याने ते अत्यंत गंभीर मानले जात आहे.

प्रशासनाकडून नोटीस चिटकवण्यात आली

याबरोबरच , ईशान्य दिल्लीतील मोहल्ला क्लिनिकमधील डॉक्टर कोरोना पॉझिटिव्ह असल्याचे निदर्शनास आल्यानंतर प्रशासनाच्या वतीने नोटीस चिटकवण्यात आली आहे. त्यात असे म्हटले गेले आहे की या मोहल्ला क्लिनिकमध्ये 12 ते 20 मार्च दरम्यान उपचार घेतलेले किंवा एखाद्याला चेकअपसाठी आणलेले सर्व लोक घरी स्वात:ला क्वॅरंटाईन करून घ्यावे . यावेळी कोणालाही काही अडचण असल्यास त्यांनी नोटीसमध्ये दिलेल्या क्रमांकावर संपर्क साधू शकता असे नोटिशीत लिहण्यात आले आहे.

यापूर्वी दिल्लीतील मौजपुरातही असेच एक प्रकरण समोर आले होते. जवळपास 800 लोकांना येथे आयसोलेट ठेवण्याचे निर्देश देण्यात आले. ईशान्य दिल्लीतील मोहल्ला क्लिनिकमध्येही ही संख्या 800 किंवा त्याहून अधिक असू शकते.