मित्राच्या बहिणीच्या घरी आलेल्या पोलीसांना धक्काबुकी ; एकाला अटक

पिंपरी : पोलिसनामा ऑनलाइन – मदतीसाठी गेलेल्या पोलिसांना धक्काबुक्की करुन सरकारी कामात अडथळा निर्माण करणाऱ्या तरुणाला पिंपरी पोलिसांनी अटक केली आहे. ही घटना पिंपरीमधील अशोक टॉकीज जवळ घडली.

गणेश आलोक शिंदे (28, रा. नेहरूनगर, पिंपरी) असे अटक केलेल्या आरोपीचे नाव आहे. याप्रकरणी पोलीस शिपाई रावसाहेब जिजाबा खोडदे यांनी फिर्याद दिली. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, बुधवारी सायंकाळी अशोक टॉकीजजवळ राहणा-या सोनम चंदवानी यांच्या घरात काही तरुण मद्यधुंद अवस्थेत घुसले. ते तरुण घरात चोरी करण्याचा प्रयत्न करीत होते. त्यामुळे सोनम चंदवानी यांनी पिंपरी चिंचवड नियंत्रण कक्षाला याबाबत माहिती दिली.

पिंपरी-चिंचवड नियंत्रण कक्षाकडून पिंपरी पोलिसांना याबाबत माहिती देण्यात आली. त्यानुसार पिंपरी पोलीस ठाण्यातील पोलिसांचे एक पथक पिंपरीमधील अशोक टॉकीजजवळ घटनास्थळी गेले. दरम्यान, सोनम यांनी त्यांच्या भावाचा मित्र गणेश शिंदे याला फोन केला. पोलीस आल्यानंतर गणेश घटनास्थळी आला. पोलीस आल्याचे समजताच घरात घुसलेले तरुण पळून गेले. त्यातील एक तरुण पोलिसांच्या हाती लागला. तो मद्यधुंद अवस्थेत होता. पोलीस त्याच्याकडे चौकशी करत होते. त्यावेळी गणेश याने मद्यधुंद अवस्थेत असलेल्या तरुणाला मारहाण केली. पोलिसांनी गणेशला समजावण्याचा प्रयत्न केला. मात्र, गणेश याने पोलिसांचे ऐकून न घेता पोलिसांनाच धक्काबुक्की केली. तपास पिंपरी पोलीस करीत आहेत.

आरोग्यविषयक वृत्त –

‘हे’ चिमूटभर नैसर्गिक ‘माऊथ फ्रेशनर’ खा, होतील अनेक फायदे

रोज सकाळी कोमट पाणी प्या, होतील ‘हे’ १० फायदे

हार्ट अटॅक अनेकदा सकाळीच का येतो? बचावाचे उपाय