वडिलांच्या खात्यावरील 10 लाख रूपये ‘ट्रान्सफर’ केले, खर्च करू शकला नाही व्यापार्‍याचा मुलगा

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – महाविद्यालयाची फी भरायची असल्याचे सांगत उच्च शिक्षण घेणाऱ्या मुलानेच वडिलांच्या बँक खात्यावरून १० लाख रुपये स्वतः च्या खात्यावर ट्रान्सफर केल्याचा प्रकार समोर आला आहे. त्यांचे क्रेडिट कार्ड घेतल्यानंतर त्यावरून पैसे ट्रान्सफर केल्यानंतर तो घरातून पसार झाला होता. परंतु पोलिसांनी वेळीच त्याची माहिती काढून त्याला पकडले. त्यामुळे वडिलांचे पैसे तो खर्च करू शकला नाही. त्याचे समुपदेशन केल्यानंतर त्याने माफी मागितली.

याप्रकरणी राजेंद्र कल्याणी (वय ५८, रा. शनिवार पेठ) यांनी विश्रामबाग पोलीस ठाण्यात तक्रार दिली होती.

पोलिसकडून मिळालेल्या माहितीनुसार, राजेंद्र कल्याणी हे व्यावसायिक असून सध्या ते घरीच असतात. दरम्यान राजेंद्र हे कडक शिस्तीचे आहेत. त्यामुळे लहान पनापासूनच त्याच्यावर दडपण होत. सध्या तो एका नामाकिंत महाविद्यालयात बीबीएचे शिक्षण घेत आहे. दरम्यान आईला गोडबोलून त्याने १० हजार रुपये घेतले. त्यानंतर वडिलांना महाविद्यालयात फी भरायची असल्याची बतावणी केली. त्यांच्याकडून क्रेडिट कार्ड घेतले. मात्र. त्यांच्या न कळत खात्यावरून १० लाख ८ हजार रुपये स्वतः च्या खात्यावर ट्रान्सफर करून घेतले. तसेच तो घराबाहेर पडला. काही वेळांत राजेंद्र याना खात्यावरून पैसे काढल्याचा एसएमएस आला. यावेळी त्यांना पैसे गेल्याचे समजले. यावेळी त्यांना मुलानेच पैसे काढलेत याची कल्पनाही नव्हती. त्यांनी तात्काळ विश्रामबाग पोलीस ठाण्यात धाव घेतली.

उपनिरीक्षक दीपक जाधव यांनी याचा तपास सुरु केला. तांत्रिक माहिती घेतल्यानंतर हा राजेंद्र याच्यांच मुलाने हे पैसे ट्रान्सफर केल्याचे समोर आले. त्यावेळी मुलाची माहिती घेतली असता तो घरातुन गेल्याचे सामजलें. त्याला पडकून विचारपूस केल्यानंतर त्याने पैसे ट्रान्सफर केल्याचे सांगतिले. यानंतर परिमंडळ एकाच्या पोलीस उपयुक्त स्वप्ना गोरे तसेच वरिष्ठ निरीक्षक दादासाहेब चुडाप्पा व दीपक जाधव यांनी मुलाला पुढील भविष्या बाबत माहिती दिली. त्याचे मार्गदर्शन केले. त्याने माफी मागत पुन्हा असे करणार नाही, असे सांगतिल्यानंतर मुलाला वडिलांसोबत घरी पाठवले.

Visit :  Policenama.com