लवकरच ‘लॉन्च’ होणार ‘वन नेशन वन टॅग’, प्रवाशांचा देशभरातील ‘प्रवास’ होणार ‘सोपा’

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – एक देश, एक कर यानंतर एक देश, एक टॅगला लवकरच सुरुवात होणार आहे. आता टोल नाक्यावर टॅक्स देताना वेगवेगळा टॅग लावण्याची आवश्यकता भासणार नाही. वेगवेगळ्या टॅगची समस्या संपवण्यासाठी येणाऱ्या काही महिन्यात ‘वन नेशन वन टॅग’ ही सिस्टिम लॉन्च करण्यात येणार आहे. ज्यामुळे तुम्ही एकाच टॅगवर कोणत्याही शहरात प्रवेश करुन शकता. ज्यामुळे ना की फक्त वेळ वाचेल तर त्यात सूट देखील मिळेल.

प्रत्येक ठिकाणी उपयोगी पडत नाही फास्टॅग
सध्या वापरात असलेला वाहनांच्या टॅगचा वापर फक्त राष्ट्रीय हायवे नेटवर्कवर आणि काही राज्यातील रस्त्यांवर टोल टॅक्स भरण्यासाठी करता येत होता. दिल्लीत येणाऱ्या सर्व कमर्शिअल वाहनांना वेगळा टॅक्स द्यावा लागत होता. हा टॅग तेथील नगरपालिका लागू करतो. जर असे झाले तर वाहतूक करणाऱ्या वाहनांसाठी वेगवेगळा टॅग द्यावा लागेल.

बैठकीत होणार निर्णय
महामार्ग परिवहन मंत्रालयाने वन नेशन वन टॅगसाठी सर्व राज्य सरकारच्या परिवहन मंत्रालय आणि संबंधित अधिकाऱ्यांबरोबर एक बैठक घेण्यात येणार आहे. या बैठकीची अध्यक्ष नितीन गडकरी असतील. परिवहन मंत्रालयाने एनएच टोल प्लाजा वरुन जाताना वाहनांना फास्टॅग खरेदी करण्यासाठी 1 डिसेंबरची डेडलाइन देण्यात आली आहे.

आतापर्यंत जारी झाले 60 लाख फास्टॅग
आतापर्यंत कार, टॅक्सी, बस आणि ट्रकसाठी देशभरात 60 लाख फास्टॅग जारी करण्यात आले आहेत. या फास्टॅगमुळे उत्तर प्रदेश, हैदराबादची आउटर रिंग आणि महाराष्ट्र, मध्यप्रदेशमध्ये राज्य महामार्ग विभाग प्रधिकरण अंतर्गत येणाऱ्या एकूण 17 राज्यांच्या रस्त्यावर टोल भरता येईल.