Pune : अपघात झालेल्या दुचाकीस्वाराला उचलण्यास गेलेल्या एकाला दोघांकडून बेदम मारहाण

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन  –  अपघात झालेल्या दुचाकीस्वाराला उचलण्यास गेलेल्या एकाला दोघांनी बेदम मारहाण केल्याची घटना गोखलेनगर परिसरात घडली.

याप्रकरणी भुपेंद्र धोत्रे (वय 36, रा. शिवाजीनगर) यांनी चतुशृंगी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्यानुसार दोघांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलीसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी व आरोपी हे तोंड ओळखीचे आहेत. दरम्यान गोखलेनगर भागात एक दुचाकीस्वाराचा अपघात झाला होता. त्यामुळे पळत जाऊन फिर्यादी त्याची मदत करत होते. मात्र यावेळी दोघे आले. त्यांनी विनाकारण फिर्यादीला शिवीगाळ करत बेदम मारहाण केली. त्यानंतर परिसरात विटा फेकून दहशत निर्माण केली. अधिक तपास सहायक निरीक्षक चव्हाण करत आहेत.

पोलीसनामा न्युज आता टेलीग्रामवर... आमचं चॅनेल (@policenamanews) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा. WhatsAPP

You might also like