बाणेर येथील एकच प्लॉट पठ्ठयानं 5 जणांना विकला, डोके लढवून घातला 1 कोटींचा गंडा

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – बाणेर येथील एक प्लॉट पाच जणांना विकण्याचा प्रताप एकाने केला असून त्यांना तब्बल १ कोटी २ लाख ४६ हजार रुपयांना गंडा घातल्याचे प्रकरण समोर आले आहे.

याप्रकरणी हिंजवडी पोलिसांनी श्री के शब्बीरबाबु अबुबकर कीझाक्कुम (वय ४२, रा. वात्सल्स विहार, नाग्रस रोड, औंध, सध्या रागधारी सोसायटी डी.पी. रोड, औंध) याच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.
याप्रकरणी प्रफुल्लकुमार राऊसाहेब रेचे (वय ४०, रा. मधुपुष्प सोसायटी, दत्तमंदिर रोड, वाकड) यांनी फिर्याद दिली आहे. हा प्रकार १२ जून २०१७ ते ८ ऑक्टोंबर २०१९ दरम्यान न्याती एम्पोरियम बिल्डिंग येथे घडला आहे.

रेचे यांना कीझाक्कुम यांनी प्लॉट विकत घेण्यासाठी १९ लाख रुपये घेतले. परंतु, तो प्लॉट यांनी रेचे यांना न देता परस्पर दुसऱ्याला विकला. याचप्रमाणे नानासाहेब पंडित जेवे यांच्याकडून १४ लाख रुपये, प्रकश व्यंकोबा बिडवाई यांच्याकडून २३ लाख ६१ हजार रुपये, अमरनाथ विभुते यांच्याकडून १२ लाख ५० हजार रुपये, तरबेज शिंगरे यांच्याकडून ३३ लाख ३५ हजार ६०० रुपये घेतले. परंत त्यांना प्लॉट न देता तो परस्पर दुसऱ्याला विकला.

Visit : Policenama.com