‘माझ्या बायोपिकमध्ये ‘ही’ अभिनेत्री असावी परंतु…’ : माधुरी दीक्षित

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन – बॉलिवूडची धकधक गर्ल माधुरी दीक्षित हिने तिच्या बायोपिक बनवण्याच्या मुद्द्यावर आपले मत मांडले आहे. माझा बायोपिक बनवण्याचा विचार जर भविष्यात झाला तर, माझी भूमिका आलिया भट्ट हिने साकारावी असे मला वाटते असे मत माधुरी दीक्षितने व्यक्त केले आहे. परंतु ती असेही म्हणाली की, एका गोष्टीवर आलियाला विशेष लक्ष द्यावे लागेल ती म्हणजे नृत्य असेही माधुरी म्हणाली.

एका वेबसाईटला दिलेल्या मुलाखतीत ती बोलताना तिला आपल्या बायोपिकमध्ये कोणाला पाहायला आवडेल असा प्रश्न विचारण्यात आला. या प्रश्नाला उत्तर देताना तिने हे आपलं मत मांडलं. सध्या बॉलिवूडमध्ये बायोपिक्स बनवण्याचा ट्रेण्ड सुरु आहे. याच पार्श्वभूमीवर तिलाही प्रश्न विचारण्यात आला. त्यावेळी तिने आलियाच्या नावाचा उल्लेख केल्याचे दिसून आले.

यावेळी आपले मत मांडताना माधुरी म्हणाली की, “मला माझ्या बायोपिकमध्ये आलियाला पाहायला आवडेल. ती एक प्रतिभावान अभिनेत्री आहे. तिच्या गल्ली बॉय, हायवे, राजी या चित्रपटातील अभिनयाने मी खूप प्रभावित झाले आहे.  माझ्या बायोपिकसाठी आलिया परफेक्ट असली तरी तिला थोडे कथ्थक शिकावे लागेल. ती चांगले नृत्य  करते पण माझ्या बायोपिकसाठी मात्र तिला नृत्यावर अधिक लक्ष द्यावे लागेल.
कलंक हा करण जोहरचा आगामी चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या  चित्रपटात माधुरी दीक्षित आणि आलिया भट्ट दोघीही एकत्र दिसणार आहेत. या चित्रपटात आलिया आणि माधुरी यांच्यासोबतच संजय दत्त, वरुण धवन, सोनाक्षी सिन्हा आणि आदित्य कपूर हेदेखील झळकणार असून त्यांच्याही प्रमुख भूमिका असणार आहेत. हा चित्रपट 17 एप्रिल रोजी जगभर प्रदर्शित होणार आहे.