Pune : आंबेगावमधील पवार महाविद्यालयात ऑनलाईन लेक्चर्स : मोहिते

पुणे : प्रतिनिधी – ‘न भूतो न भविष्यती’ असे काहीसे संपूर्ण जगात घडत आहे कोरोना विषाणूचा विळखा घट्ट होत आहे. त्यामुळे विद्यार्थी ज्ञानमंदिरापासून दूर जाऊ नये, यासाठी ऑनलाईन लेक्चर्स सुरू केले. त्याला विद्यार्थ्यांचा उत्तम प्रतिसाद मिळत आहे, असे आंबेगाव येथील एस. एस. पवार महाविद्यालयाच्या विभागप्रमुख अश्विनी मोहिते यांनी सागंतिले.

मोहिते म्हणाल्या की, व्हाट्सअ‍ॅपचा सायन्स आणि कॉमर्स विद्यार्थ्यांचा ग्रुप केला. झूम ॲप डाऊनलोड करायला सांगितले. युट्युबवरून लिंक मुलांना दिल्या. शिक्षकांच्या युट्युबवर त्या त्या विषयाचे दहा ते पंधरा मिनिटाची व्हिडिओ तयार करून विद्यार्थ्यांना ग्रुप वर सेंड केले. अकरावी आणि बारावी यासाठी मोफत ऑनलाइन टिचिंग शिक्षकांनी सुरू केले. या अ‍ॅपद्वारे पीपीटी प्रेझेन्टेशन व्हिडिओ आणि व्हाईट बोर्ड उपलब्ध असतो वर्गात फळ्यावर शिकवतो त्याप्रमाणे शिकवता येते. उपस्थिती घेता येते. वर्गात शिकवतो, त्याप्रमाणे विज्युअल क्लासरूममध्ये आपण शिकू शकतो. महाविद्यालयातील परीक्षेची सोय गुगल फॉर्म व testmoz ने सोय करून दिली शिक्षकांनी विद्यार्थ्यांना ऑनलाइन टेस्ट ही सुरू केल्यानंतर त्यांच्या प्रगतीचा आढावाही घेतला आहे. ऑनलाइनच्या या जगात आयटीसारख्या मोठ्या कंपन्यांवर work form home करत असताना आमचे विद्यार्थी ज्ञानार्जन करत आहेत. त्याचे समाधान एक विभाग प्रमुख म्हणून मनाला सुखावून गेले. बंक मारणारे विद्यार्थी सगळ्यात आधी ऑनलाइन क्लासला मात्र हजर असतात. तेव्हा वाटते की भिंतीपलीकडे शिक्षण हे तर नाही ना, त्यासाठी आभार मानावे वाटतात. learnTEZ या ॲपचे ज्यांनी आम्हाला मोफत हे अ‍ॅप उपलब्ध करून दिले. त्यामुळे आम्ही आमच्या विद्यार्थ्यापर्यंत पोहचू शकलो. आज महाविद्यालयातील 60 ते 70 विद्यार्थी या ऑनलाइन क्लासचा अनुभव घेत आहेत, असे त्यांनी सांगितले.