बघूया कोणाचे नशीब जोरावर ? … तिने ट्रिगर दाबला … अन एकच किंकाळी … 

ग्वाल्हेर: वृत्तसंस्था 
इंटरनेटमुळे जग जवळ आले असे म्हणतात पण त्याचे जेवढे फायदे आहेत तेवढेच तोटे देखील आहेत. इंटरनेटवर काही जीवघेणे गेम तरुणांना वेड लावत आहेत. ब्ल्यू व्हेल, ‘मोमो’ गेमनंतर आता ‘रुसी रुले’ गेम जीवघेणा ठरतोय. या गेम मुळे मधील २१ वर्षीय तरुणीने स्वतःवर गोळ्या झाडून आत्महत्या केल्याची घटना घडली आहे. करिश्मा यादव असं पीडित तरूणीच नाव आहे. तर, करिश्माचे वडील निवृत्त पोलिस अधिकारी आहेत. करिश्माला ‘रुसी रुले’ या गेमचं प्रचंड वेड होते.
काय आहे ‘रूसी रुले’
मोमो आणि ब्लू व्हेलप्रमाणेच ‘रूसी रुले’ गेममध्ये बंदुकीत फक्त एक गोळी ठेवून बंदूक स्वतःच्या डोक्यावर ठेवून चालवण्याचा टास्क या गेममध्ये दिला जातो. बंदुकीचं ट्रिगर दाबल्यानंतर गोळी चालली नाही तर आपण नशीबवान ठरतो. असा हा गेम आहे.
करिश्मा तिच्या दिल्लीतील मित्रांसोबत व्हॉट्सअॅपवर व्हिडिओ कॉलवर गप्पा मारत असतानाच ती एकीकडे ऑनलाइन ‘रुसी रुले’ गेम खेळत होती. मित्रांशी गप्पा मारत असतानाच करिश्माने  तिच्याजवळ असलेली बंदूक मित्रांना दाखवली आणि बंदुकीत एक गोळी टाकून बंदुकीचं चेम्बर फिरवले. बघुयात आज कोणाचं नशीब जोरावर आहे, असे  म्हणत तिने बंदूक चालवली आणि दुर्देवानं तिचा त्यात मृत्यू झाला.