SBI मध्ये उघडा हे खास अकाऊंट ! वाटेल त्यावेळी जमा करा पैसे, FD एवढं मिळवा व्याज, जाणून घ्या

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – देशातील सर्वात मोठी बँक स्टेट बँक ऑफ इंडिया (एसबीआय) लोकांना अनेक प्रकारच्या बचत योजना ऑफर करते, ज्यामध्ये पैसे गुंतवून तुम्हाला चांगले व्याज मिळू शकते. एसबीआयची फ्लेक्सी डिपॉझिट स्कीम ही रिकरिंग डिपॉझिट (आरडी) सारखीच योजना आहे, पण यात तुम्हाला पैसे जमा करण्याची सवलत मिळते. याचा अर्थ तुम्ही एकाच वेळी अनेक महिन्यांची इन्स्टॉलमेंट भरू शकता. या योजनेमध्ये इन्स्टॉलमेंट रक्कम निश्चित केलेली नाही. ग्राहक त्यांच्यानुसार इन्स्टॉलेमेंटची रक्कम कमी-जास्त करू शकतात. तर जाणून घेऊया योजनेबद्दल…

किती गुंतवणूक करू शकता?
एसबीआय फ्लेक्सी डिपॉझिट खाते उघडल्यानंतर तुम्ही दरमहा ५०००, १०,००० जमा करू शकता. दर वर्षी ५०,००० पर्यंत जमा करू शकता. यात महिन्यात तुम्ही कधीही पैसे जमा करू शकता. एसबीआय फ्लेक्सी डिपॉझिट योजनेसाठी किमान कालावधी ५ वर्षे आणि जास्तीत जास्त ७ वर्षे आहे. त्यावर मिळणारे व्याज फिक्स्ड डिपॉजिटवर मिळणाऱ्या व्याजाप्रमाणे आहे. वेळेपूर्वी खाते बंद केल्यास त्यात काही दंड भरावा लागू शकतो. एका इन्स्टॉलमेंटसाठी किमान रक्कम ५०० रुपये आहे.

कसे उघडायचे खाते?
यात गुंतवणूक करण्यासाठी तुम्हाला बँकेत जाण्याची गरज नाही. नेट बँकिंग वापरत असल्यास ते ऑनलाइन उघडू शकता. भारतातील कोणताही नागरिक ते उघडू शकतो. ही योजना अल्पवयीन मुलांसाठी देखील उपलब्ध आहे. खाती सिंगल किंवा जॉईंट मध्ये उघडली जाऊ शकतात. नॉमिनी व्यक्तीची नोंदणी करण्यासाठी तुम्हाला बँकेत जाण्याची गरज नाही. तुम्ही खाते उघडतानाच नॉमिनी व्यक्तीची नोंदणी करू शकता.

एसबीआय फ्लेक्सी डिपॉझिट योजनेमध्ये प्रीमॅचुअर क्लोजची सुविधा आहे. मात्र अशात ५ लाखांपर्यंतच्या ठेवींच्या सर्व कालावधीच्या बाबतीत व्याज दर ०.५० टक्क्यांनी कमी करण्यात येईल. तसेच ५ लाखांपेक्षा जास्त ठेवींसाठी व्याजदरात १ टक्क्यांनी कपात केली जाईल.

मिळणार हे फायदे
मूळ ठेवीच्या ९०% पर्यंत कर्ज/ ओव्हरड्राफ्ट घेण्याची सुविधा मिळेल. ज्येष्ठ नागरिकांसाठी व्याज दर लागू दरापेक्षा ०.५० टक्के अधिक असेल. हे खाते उघडल्यानंतर ७ दिवस पूर्ण होण्यापूर्वी बंद केल्यास व्याज शून्य राहील.