पुणे : समाजातील ‘प्रतिष्ठीत’ चोरांकडून १०० गुन्हे उघडकिस, ३० लाखांचा एेवज जप्त

पुणे : पोलीसनामा ऑनलाईन

ऐशो आरामाचे जीवन जगण्यासाठी पुणे शहर आणि परिसरात चैन चोरी आणि बॅग लिफ्टींग करणाऱ्या दोन चोरट्यांना गुन्हे शाखा युनिट ५ च्या पथकाने अटक केली आहे. चोरीच्या पैशातून समजातील प्रतिष्ठीत व्यक्ती असल्याचे भासवून चोरी करण्याचा उद्योग या चोरट्यांचा होता. या चोरट्यांनी तब्बल १०० चैन चोरीचे आणि बॅग लिफ्टींग, वाहन चोरी, मोबाईल चोरीचे गुन्हे केल्याचे उघड झाले आहे. पोलिसांनी या गुन्ह्यातील ३० लाख ७९ हजार ८२० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. यामध्ये २३ लाख ६३ हजार ६७८ रुपयांचे ८५६.४६ ग्रॅम वजनाचे दागिने जप्त करण्यात आले आहेत.
[amazon_link asins=’B01951R2S2,B01DU5OJCQ’ template=’ProductCarousel’ store=’policenama-100′ marketplace=’IN’ link_id=’fce82ba3-b8e7-11e8-ad3c-f361a7feaa05′]

राजु खेमु राठोड उर्फ राजाभाऊ खेमराज राठोड ( वय-३४ रा. जुना मुंढवा रोड, वडगावशेरी मुळ रा. लातूर), शंकरराव उर्फ शिवा रामदास बिरादार (वय-३४ रा. लोणीकाळभोर, मुळ रा. असिफनगर, हैद्राबाद) असे अटक करण्यात आलेल्या प्रतिष्ठीत चोरट्यांची नावे आहेत.

पुणे आणि पिंपरी-चिंचवड शहर तसेच पुणे ग्रामीण परिसरामध्ये सोन साखळी चोरी, बॅग लिफ्टींग व इतर गुन्हे करणारे दोघा जणांना मांजरी बुद्रुक येथून जाताना पाहिल्याची माहिती खबऱ्याने दिली. पोलिसांनी दोन पथके तयार करुन आरोपींचा शोध सुरु केला. मांजरी येथील ग्रीन सोसायटी रोडवर सापळा रचला असता दोघेजण हेल्मेट घालून दुचाकीवरुन येताना पोलिसांना दिसले. त्यांना अडवून त्यांच्याकडे असलेल्या बजाज डॉमिनोर दुचाकीची माहिती विचारली असता उडवाउडवीची उत्तरे दिली. पोलिसांना संशय आल्याने त्यांची अंगझडती घेतली. अंगझडतीमध्ये तुटलेले सोन्याचे दागिने, पकल्यानंतर पळून जाण्यासाठी डोळ्यात मारण्याचा स्प्रे, फायटर अशा वस्तू सापडल्या. पोलिसांनी त्यांना अटक करुन चौकशी केली. चौकशीदरम्यान, या दोघांनी पुणे आणि परिसरात तब्बल १०० गुन्हे केल्याची माहिती दिली.
[amazon_link asins=’B077RV8CCY,B015T0YLAA’ template=’ProductCarousel’ store=’policenama-100′ marketplace=’IN’ link_id=’02b2dde5-b8e8-11e8-bc33-9d01dc62ca8c’]

बिगारी कामगार झाला प्रतिष्ठीत चोर

आरोपी राजाभाऊ राठोड हा काही दिवसांपूर्वी बिगारी काम करत होता. त्यानंतर त्याने बिगारी काम सोडून लातुर आणि पुणे परिसरात  इलेक्ट्रीशियन, वायरमन म्हणून काम केले. त्यानंतर त्याने लातूरमध्ये रियल इस्टेट एजंटच्या माध्यमातून प्लॉटींगचा व्यवासय केला. या व्यवसायातून त्याला पुरेसे पैसे मिळत नसल्याने त्याला मौजमजा करता येत नव्हती. त्यामुळे त्याने सोनसाखळी चोरण्याचा मार्ग निवडला. लातुरमध्ये सोनसाखळी व बॅग चोरी करण्यास सुरुवात केली. लातूर पोलीस ठाण्यात त्याच्यावर अनेक गुन्हे दाखल आहेत. चोरीच्या पैशातून त्याने लातुरमध्ये एक मोठा बंगला खरेदी केला आहे. चोरीचा मुद्देमाल विकून मिळालेल्या पैशातून समाजात प्रतिष्ठित व्यक्ती म्हणून नावारुपास येण्याचा प्रयत्न केला. दरम्यानच्या काळात त्याची राजकीय व्यक्तींसोबत ओळख झाली. त्याने राजकीय पक्षातील लोकांची ओळख वाढवून जिल्हा परिषदेची निवडणूक देखील लढविण्याचा प्रयत्न केला हाेता. लातुर पोलिसांनी त्याला सोनसाखळी चोरताना रंगहेथ पकडले. त्यामुळे त्याचा खरा चेहरा समाजापुढे आला.

आरोपींची जेलमध्ये मैत्री

राजु राठोड याला लातुर पोलिसांनी सोनसाखळी चोरीच्या गुन्ह्यात अटक केल्यानंतर त्याची तुरुंगात रवानगी करण्यात आली. तुरुंगात असताना त्याची शंकरराव उर्फ शिवा बिरादार यांची ओळख झाली. जेलमधून सुटल्यानंतर त्यांनी आपले बस्तान पुणे शहरात मांडले. सुरुवातीला पुणे शहरातून एक दुचाकी चोरुन रिक्षातून बॅग चोरी व सोनसाखळी चोरी करण्यास सुरुवात केली. कालांतराने चोरलेली  दुचाकी सोडून देऊन नवीन दुचाकीची चोरी करीत होते. सोनसाखळी आणि बॅग लिफ्टींगमधून मिळालेल्या पैशातून पुण्यातील प्रतिष्ठीत भागात ते रहात होते. राठोड याने चोरीच्या पैशातून जुना मुंढवा रोडवर नंदिनी नावाचे हॉटेल देखील सुरु केले. होते. शंकर याच्यावर लातूर पोलीस ठाण्यात फसवणूकीचा गुन्हा दाखल आहे.
[amazon_link asins=’B01BMDTSJ2,B01NB1SQMO’ template=’ProductCarousel’ store=’policenama-100′ marketplace=’IN’ link_id=’09d88ba8-b8e8-11e8-8e87-7f74f1aee22f’]

चोरीचे ठिकाण

अटक करण्यात आलेले आरोपी पुणे शहर व पुणे ग्रामीणमध्ये सकाळी मॉर्निंग वॉक व सकाळी बस थांबे, एस.टी. थांब्यावर येणाऱ्या प्रवाशांना आपले लक्ष बनवत. या दोघांनी तब्बल १०० च्या आसपास चैन चोरी व बॅग चोरी केल्याची कबुली दिली आहे. पुणे शहरातील हडपसर, कोंढवा, वारजे माळवाडी, भारती विद्यापीठ, सिंहगड रोड, अलंकार, डेक्कन, शिवाजीनगर, बंडगार्डन, कोथरुड, स्वारगेट, येरवडा, विमानतळ, कोरेगाव पार्क, विश्रामबाग, पिपरी-चिंचवड मधील पिंपरी, भोसरी, निगडी तसेच ग्रामीण कडील लोणी काळभोर, यवत, देहुरोड या ठिकाणी ४४ गुन्हे केले आहेत. यामध्ये सोनसाखळीचे  १९, बॅग लिफ्टींगचे २२ वाहन चोरी ३ असे गुन्हे या दोघांनी केले आहेत.

जप्त करण्यात आलेला मुद्देमाल

आरोपींनी पुणे शहर तसेच परिसरामध्ये केलेल्या गुन्ह्यामधला ३० लाख ७९ हजार ८२० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. जप्त केलेल्या मुद्देमालामध्ये २३ लाख ६३ हजार ६७८ रुपयांचे ८५६.४६ ग्रॅम वजनाचे सोन्याचे दागिने, ४ हजार ५०० रुपयांचे चांदीचे दागिने, ३ लाख ९९ हजार ७५० रुपयांची रोख रक्कम, २ लाख रुपये किंमतीच्या दोन दुचाकी, १ लाख ११ हजार ८९२ रुपयांचे मोबाईल आणि इतर वस्तू जप्त करण्यात आले आहेत.
[amazon_link asins=’B00IHS3RGQ,B00FO6APKU’ template=’ProductCarousel’ store=’policenama-100′ marketplace=’IN’ link_id=’0f25f851-b8e8-11e8-880d-81c035a3eca8′]

ही कारवाई अप्पर पोलीस आयुक्त गुन्हे प्रदीप देशपांडे, पोलीस उपायुक्त गुन्हे शिरिष सरदेशपांडे, सहायक पोलीस आयुक्त गुन्हे -२ भानुप्रताप बर्गे यांच्या मार्गदर्शनाखाली युनिट ५ चे प्रभारी अधिकारी दत्ता चव्हाण, सहायक पोलीस निरीक्षक संतोष तासगांवकर, सहायक पोलीस निरीक्षक भालचंद्र ढवळे, सहायक पोलीस फौजदार लक्ष्मण शिंदे, अजय जाधव, पोलीस हवालदार संतोष मोहिते, प्रविण शिंदे, राजेश रणसिंग, सचिन घोलप, समीर शेख, अमजद पठाण, केरबा गलांडे, प्रदीप सुर्वे, पोलीस नाईक प्रमोद घाडगे, दया शेगर, प्रमोद गायकवाड, महेश वाघमारे, प्रविण काळभोर, अंकुश जोगदंडे, अशोक शेलार, संजयकुमार दळवी व स्नेहल जाधव यांच्या पथकाने केली.

पोलीसनामाचे फेसबुक पेज लाईक करा.

पोलीसनामाला ट्विटरवर फाॅलो कर.

पोलीसनामाचे युट्यूब चॅनेलला सब्सक्राईब करा.

पोलीसनामाच्या टेलिग्राम चॅनेलला जाॅईन व्हा.