हेलिकॉप्टरमधून राजगड पाहण्याची संधी !

उन्हाळी सुट्टीमध्ये ५ मे रोजी आयोजन

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – छत्रपती शिवरायांची तब्बल २५ वर्षांची पुण्यातील राजधानी दुर्गदुर्गेश्वर राजगड…! तीन माच्यांनीयुक्त… अजोड बांधकाम अन् अनेक घटनांचा साक्षीदार राजगड आहे. हाच पराक्रमी, शौर्यशाली राजगड हेलिकॉप्टरमधून पाहण्याची प्रथमच संधी उपलब्ध झाली आहे.

उन्हाळी सुट्टीमध्ये महाराष्ट्रात प्रथमच गडकोटांची हवाई सफर मालिका ५ मे रोजी अमेझिंग महाराष्ट्र टुरिझम व शिवराष्ट्र हायकर्सतर्फे आयोजित केली आहे. हवाई दर्शनाचा अनोखा अनुभव, अविस्मरणीय क्षणाचे साक्षीदार व्हा ! विमान प्रवास कधीही अनभवू शकता, मात्र हवाई किल्ले दर्शन, तेही हेलिकॉप्टरमधून… दुर्मीळच संधी आहे.

मर्यादित सीट्समुळे १५ एप्रिल पूर्वी आपले तिकीट आजच बुक करा ! या हेलिकॉप्टर राईडचे ५७०० रुपये शुल्क आहे. अधिक माहितीसाठी ७५१९७११७११ या क्रमांकावर संपर्क साधावा. https://easebuzz.in/link/Rajgad-Helicopter-Ride या लिंकवरून ऑनलाईन रजिस्ट्रेशनसाठी आपण करू शकता. सविस्तर माहितीसाठी www.amazingmaharashtra.in या वेबसाईट व https://www.facebook.com/Amazing-Maharashtra-361107457831052/ या फेसबुकपेजला भेट द्यावे.