उस्मानाबाद जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेची ढोकी शाखा फोडली १६ लाखांची रोकड लंपास

उस्मानाबाद : पोलीसनामा ऑनलाइन – तालुक्यातील ढोकी येथील उस्मानाबाद जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या शाखेवर शुक्रवारी मध्यरात्री अज्ञात दरोडेखोरांनी दरोडा टाकला. मागील लोखंडी दरवाजा तोडून दरोडेखोरांनी आत प्रवेश केला आणि तिजोरी गॅस कटरने फोडून 1617491 रुपये ची रोकड लंपास केल्याने एकच खळबळ उडाली आहे. मात्र पैसे हे शेतकरी विमा चे होते त्यामुळे चोरांनी शेतकरी कराच्या पैसा वर डल्ला मारला आहे.

ढोकी येथील उस्मानाबाद जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या शाखेवर शुक्रवारी पडला होता. हा प्रकार शनिवारी सकाळी उघडकीस आला आहे. पोलीस ठसे तज्ज्ञ आणि श्वान पथकास पाचारण केले होते. श्वानाने संपूर्ण परिसर पिंजून काढला. परंतु, चोरट्यांचा माग गवसला नाही. तसेच बॅक मध्ये सुरक्षा रक्षक नसल्याने व बँकेत ‘सीसीटीव्ही’ बसविण्यात आलेले नाहीत. त्यामुळे आता पोलीसांसमोर चोरी उघड करण्याचे मोठे आव्हान उभे आहे.

अगोदरच जिल्हा मध्यवर्ती बॅका आर्थिक दिवाळखोरीत सापडलेल्या या बँकवर दरोडा पडल्याने शेतकऱ्यांचे पैसे कसे मिळणार ? असा प्रश्न निर्माण झाला आहे. एकीकडे शेतकऱ्यांना पैसे देण्यास टाळाटाळ करणाऱ्या डीसीसी बँकेच्या कारभाराची लक्तरे पुन्हा एकदा चव्हाट्यावर आली आहेत.
मॅनेजर बाळासाहेब रावसाहेब खांडेकर यांच्या फिर्यादीवरून ढोकी पोलीस ठाण्यात अज्ञात चोरटय़ांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे..

Visit : Policenama.com

Loading...
You might also like