थायलंड मध्ये दिसले ‘नामशेष’ झालेले सागरी ‘जीव’, कासवं आणि शार्क करतायेत ‘एन्जॉय’

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – लॉकडाऊनमुळे सर्व पर्यटनस्थळे ओसाड आहेत, म्हणून थायलंडच्या शांत किनाऱ्यावर आजकाल सागरी जीव दिसत आहेत जे नामशेष झाले होते जसे कि लेदरबॅक कासवं. आजकाल थायलंडमधील सर्व किनाऱ्यावर कासवं आणि शार्क फिरत आहेत. हे कमी दिसणारे सागरी जीव समुद्रकाठी फिरताना दिसत असून तज्ञांचे म्हणणे आहे कि कोरोना विषाणूचा सागरी जीवांच्या अस्तित्वावरही नकारात्मक प्रभाव पडतो.

कोविड-१९ सारख्या महामारीला रोखण्यासाठी जगभरातील लॉकडाऊन सुरूच आहे आणि लोक त्यांच्या घरात बंदिस्त राहून शारीरिक अंतराचे पालन करत आहेत. थायलंडने एप्रिलच्या सुरुवातीला परदेशी पर्यटकांसाठी आपली सीमा बंद केली. मागील वर्षी ४०० लाख पर्यटकांना येथे येण्यास थांबवण्यात आले होते.

अनेक नैसर्गिक उद्याने चालवणारे सागरी जीवशास्त्रज्ञ तीराणाई फेटसोम म्हणाल्या, ‘महामारीमुळे मानवी क्रियाकलाप कमी झाले आहेत. व्यवसाय बंद आहेत आणि पर्यटकांसाठी मोटरबोट संचालनही बंद आहे. म्हणूनच सागरी जीवांना त्रास देणारे घटक नगण्य आहेत. आता ते आपल्या अन्नाच्या शोधात बाहेर जाऊ शकतात.’ तज्ञांच्यानुसार, या भागात सुमारे १३० ड्युगोंग आहेत, जे नामशेष झालेल्या सागरी जीवांची प्रजाती आहे. यासह १०० कासवांसह बरेच डॉल्फिन येथे फिरत आहेत.

जॅकपॅननुसार, गेल्या नोव्हेंबरपासून देशाच्या पश्चिम किनाऱ्यावर विलुप्त लेदरबॅक कासवं आणि सागरी हिरवी कासवं दिसू लागली आहेत. जॅकपॅन मुआंगिम यांनी सांगितले की, पर्यटकांची कमी वन्य जीवांसाठी मोठा दिलासा आहे आणि हरवलेले सागरी जीव परत येण्याची चिन्हे आहेत.