Coronavirus : जग ‘कोरोना’नं त्रस्त झालं असताना ‘या’ मंत्र्याला मास्क कसं घालायचं हे देखील कळेना (व्हिडीओ)

नवी दिल्ली  :  वृत्तसंस्था  –    जगातील सर्व देश कोरोना विषाणूमुळे त्रस्त आहेत. कोरोना विषाणूची लागण होण्यापासून रोखण्यासाठी जगभरात दोन पद्धती अवलंबल्या जात आहेत, त्यापैकी एक म्हणजे मास्क आणि दुसरे म्हणजे सॅनिटायझर्सचा वापर. या दोन्ही पद्धती वापरुन लोक कोरोना विषाणूचा संसर्ग टाळू शकतात. याबद्दल सर्वानाच माहित आहे, परंतु बेल्जियममधून एक व्हिडिओ समोर आला आहे ज्यामध्ये असे दिसते आहे की, आतापर्यंत लोकांना मास्क कसे घालायचे हे माहित नव्हते. हा व्हिडिओ कोणत्याही सामान्य माणसाचा नसून तेथील कायदामंत्र्यांचा आहे. हा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. आतापर्यंत लाखो लोकांनी हा व्हिडिओ पाहिला असून या कायदा मंत्र्यांचे नाव क्वेन गेंज आहे.

तीन वेळासुद्धा मास्क घालू शकले नाही

बेल्जियमचे कायदा मंत्री क्वेन गेंज कोरोनापासून बचाव करण्यासाठी मास्क घालण्याचा प्रयत्न करीत होते. यावेळी, ते दोनदा मास्क घालण्याचा प्रयत्न करतात, तिसर्‍या प्रयत्नात, ते मास्क घालण्यास सक्षम होतात, परंतु ते देखील योग्य मार्गाने नाही. त्यांनी आपला मास्क ज्या पद्धतीने परिधान केला आहे, ते बर्‍याच मीडिया कर्मचार्‍यांनी त्यांच्या कॅमेर्‍या आणि व्हिडिओंमध्ये टिपले आहेत, त्यानंतर हा व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे.

मंत्री क्वीन गेंज सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या आपल्या व्हिडिओमध्ये मास्क घालण्याचा प्रयत्न करत आहेत. कधी गेंज डोक्यावर मास्क घालतात, तर कधी मास्क डोळ्यावर घालतात, कायदामंत्री त्यानंतर प्रयत्न करूनही मास्क घालू शकले नाहीत. कायदामंत्र्यांची मास्क घालण्याची पद्धत सोशल मीडियावर चांगलीच व्हायरल होत आहे. लोक या कृत्याचा खूप आनंद घेत आहेत. व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर लोक सर्व प्रकारच्या प्रतिक्रिया देत आहेत. काही म्हणाले की, कायदामंत्र्यांकडून अशी अपेक्षा नव्हती, एकाने लिहिले की, कायदामंत्र्यांनी मस्कवर अन्याय केला आहे. तर कोणी लिहिले की, जगातील नेते मास्क परिधान करून जनतेला मास्क घालण्यास उद्युक्त करीत आहेत, म्हणून मास्क परिधान केल्याबद्दल कायदामंत्र्यांची थट्टा करणे योग्य नाही.